28.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

रशिया, जपानला त्सुनामीची धडक प्रशांत महासागरात ८.८ रिश्टर तीव्रतेचा भूकप

रशियाच्या अतिपूर्वेकडील भागाला आज सकाळी साडेआठ वाजता...

लांजा विकास आराखडा रद्द होणार नाही – आमदार किरण सामंत

लांजा विकास आराखडा प्रसिद्ध झाला तेव्हा समन्वयाची...

सीआरपी महिलांचे रत्नागिरीत धरणे आंदोलन

महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित लोकसंचालित साधनकेंद्रातील...
HomeRatnagiriशिवापॅलेसमधील १४ दालने होणार विकसित, पर्यटनस्थळाला आणखी नवा साज

शिवापॅलेसमधील १४ दालने होणार विकसित, पर्यटनस्थळाला आणखी नवा साज

थिबा पॅलेसमध्ये नऊऐवजी आता १४ विविध प्रकारची दालने पर्यटकांसाठी विकसित केला जाणार आहे. लवकरच त्याची निविदा प्रक्रिया केली जाणार आहे.

शहरातील थिबा पॅलेस या प्रसिद्ध पर्यटनस्थळाला आणखी नवा साज येणार आहे. पॅलेसच्या सुशोभीकरणासाठी मंजूर झालेल्या ३ कोटी १७ लाख रुपयांच्या कामांना शासनाकडून तत्वतः मान्यता दिली आहे. यातून थिबा पॅलेसमध्ये नऊऐवजी आता १४ विविध प्रकारची दालने पर्यटकांसाठी विकसित केला जाणार आहे. लवकरच त्याची निविदा प्रक्रिया केली जाणार आहे. दोन वर्षात या दालनांची कामे पूर्ण होतील,  पुरातत्त्व विभागाने सांगितले. थिबा राजाचे वास्तव्य असलेल्या रत्नागिरी शहरातील थिबा राजवाड पर्यटकांसाठी सुसज्ज करण्यावर शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. हा राजवाडा पुरातत्त्व विभागाकडे आहे. याचे मजबुतीकरण काही महिन्यांपूर्वीच झाले होते.

राजवाडा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना आतमध्ये नावीन्यपूर्ण काहीतरी पाहावयास मिळावे, या उद्देशाने पुरातत्त्व विभागाकडून यापूर्वी ९ दालने विकसित करण्याचा निर्णय घेतला होता.आता त्यामध्ये बदल करण्यात आला असून, नव्यान १४ विविध दालने विकसित केली प जाणार आहेत. कोरोनामुळे ३ कोटी १७ लाखांचा हा प्रस्ताव पडून होता. मागील वर्षी शासनाने याला निधी मंजूर केला असून, तांत्रिक प्रक्रिया सुरू झाली. आता १४ दालनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. थिबा राजवाड्यातील संग्रहालयात सध्या चार दालने आहेत. त्यामध्ये ऐतिहासिक साक्ष देणाऱ्या वस्तू पर्यटकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत.

या दालनांच्या सुशोभीकरणासह आणखी पाच नवीन दालने उभारण्यात येणार आहेत. यामध्ये इतिहासाची साक्ष देणारे फोटो. लावले जाणार आहेत. यामध्ये दरबार हॉल, कातळशिल्प दालन, आरमार दालनांचा समावेश आहे. आरमास दालनात ३० युद्धनौकांच्या प्रतिकृती ठेवल्या जाणार आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महारांजांनी आरमार कसे उभे केले, कान्होजी आंग्रेच्या आरमाराची माहिती असेल तसेच पर्यटकांना संपूर्ण परिसर फिरता येईल, असे नियोजन केले जाईल. जिल्ह्यातील सर्व कातळशिल्पांचे फोटो, त्याचे महत्व सांगणारे फोटो, माहितीपत्रके दालनात ठेवली जाणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular