रशिया आणि युक्रेन मध्ये सुरु असणाऱ्या युद्धामुळे अनेक भारतीय तिथे अडकून पडले आहेत. आणि सुखरूप सुटका करण्यासाठी भारतीय मंत्रालयाशी फोनद्वारे संपर्कात आहेत. युक्रेनमधील खारकीव येथे सकाळी झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालय त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे.
घडले असे कि, भाजीपाला आणण्यासाठी बाजारात गेलेला कर्नाटकातील नवीन शेखरपा या विद्यार्थ्यांचा बाँब स्फोटात मृत्यू झाला. खारकीव येथे झालेल्या या हल्ल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिल्यानंतर कर्नाटकातील कटुंबाला याची माहिती मिळाली. सारे कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.
सारे गावकरी माहिती कळताच शेखरपा यांना धीर देण्यासाठी जमले आहेत. दोनच दिवसांपूर्वी नवीन याने वडिलांच्या मोबाईल वर व्हिडीओ कॉल करून सगळ्यांशी बोलला होता. कुटुंबियांनीही त्याची चौकशी केली होती. आज त्याच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर मात्र कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. आता आपल्या लेकराला परत कधीच पाहता येणार नाही या विचारानेच कुटुंबाने हंबरडा फोडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोडी यांनीसुद्धा त्याच्या वडिलांशी फोनवर संपर्क साधला असून त्यांचे सात्वन केले आहे.
तर काही विद्यार्थी अथक परिश्रमाने, या युद्ध काळातून सुखरूप परतले आहेत. युक्रेन रशिया युद्धात युक्रेन देशातील आयव्होनो फ्रॅन्कीव्हस्क या शहरात अडकलेला सावंतवाडीतील सोमेश नागेंद्र टक्केकर हा युवक अखेर मंगळवारी रात्री सावंतवाडी येथे आपल्या घरी दाखल झाला. त्याला सुखरुप पाहून आईवडिलांनी सुटकेचा निश्वास टाकला. सोमेश नागेंद्र टक्केकर हा विद्यार्थी युक्रेनमध्ये आयव्होनो फ्रॅन्कीव्हस्क नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी युक्रेन येथे एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात शिकत होता. तेथील युद्धाच्या परिस्थितीमुळे त्यांच्या आई-वडिलांचा जीव टांगणीला लागला होता. तो राहत असलेल्या शहरातून रोमानिया देशात जात, तेथून विमानाने सोमवारी तो विमानाने दिल्ली येथे आला होता. मंगळवारी सायंकाळी तो गोवा वास्को विमानतळावर पोहोचल्यावर त्याच्या आईवडिलांचा जीव मुठीत पडला. तर सोमेश यांनी भारत सरकार आणि हितचिंतकांचे त्यांनी आभार मानले.