26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriरत्नागिरीतील गजब चोरी

रत्नागिरीतील गजब चोरी

रत्नागिरीमध्ये सध्या विविध प्रकारचे गुन्हे , चोऱ्या याला आळा बसला होता. परंतु, कालांतराने या चोऱ्या पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. घरफोडी, छोटी चोरी, दागिन्यांची चोरी, वाहनांची चोरी या अशा अनेक चोऱ्या आपण ऐकल्या असतील. पण आज आपण एका गजब चोरीबद्दल जाणणार आहोत.

रत्नागिरी शहरातील परटवणे येथे वरिष्ठ संशोधक फिलो केंद्रीय निखारे मत्स्यसंवर्धन संस्था, चेन्नई अंतर्गत शहरातील मत्ससंवर्धन तलाव बांधलेला आहे. त्यामध्ये खेकडे पालन केले जाते. लहान खेकड्यांची योग्य प्रकारे पालन करून त्यांना वाढविण्यात येते. त्याच सरकारी मत्स्यसंवर्धन तलावातील खेकडे काढून घेऊन, चोरट्यानी तब्बल १२ हजार रुपये किंमतीच्या खेकड्यांची चोरी केली आहे. शहरात एका वेगळ्याच प्रकारची चोरी समोर आली आहे.

१५ किलो म्हणजे साठ मोठे खेकडे चोरट्यानी तब्बल १२ हजार रुपये किंमतीच्या खेकड्यांची चोरी केली आहे. येथील व्यवस्थापकांनी या तलावातून २५ जुलै ते २६ जुलैच्या दरम्यान अज्ञात इसमाने ३०० ते ५०० ग्रॅम वजनाचे एकूण १५ किलो खेकडे चोरीला गेल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. या ठिकाणी छोटा खेकड्यांचे पालन करून त्यांना मोठे केले जाते यासाठी त्यांना रोज खाद्य दिले जाते, त्याचवेळी खेकडे चोरीला गेल्याची घटना येथील व्यवस्थापनाला लक्षात आली. त्यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली असून पोलीस खेकडे चोरांच्या शोधात आहेत. आखाडीचा तिखटा सण साजरा करण्यासाठी चोरट्यांनी या खेकड्यांवर डल्ला मारला असण्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. कोणतरी माहितगारानेच ही चोरी केल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular