रत्नागिरीकरांनी उग्र आंदोलन करुन प्रदूषणकारी स्टरलाईट प्रकल्पाला पळवून लावले होते. कार्यवाही पूर्णत्वास रत्नागिरी औद्योगिक क्षेत्रातील सुमारे ५५० एकर जागा स्टरलाईट कंपनीच्या ताब्यात होती. ही जागा पुन्हा एम. आय. डी. सी. कडे वर्ग करण्याची कार्यवाही जवळपास पूर्ण झाली आहे. एमआयडीसीच्या ताब्यात जागा आल्यावर तेथे बडे प्रकल्प आणणे शक्य होणार होते.
ना. उदय सामंतांचे परीश्रम – आता ही जागा एमआयडीसीकडे वर्ग होत असल्याने तेथे बडे प्रकल्प आणण्याचा मार्ग एकदाचा मोकळा झाला. उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी त्यासाठी फार मोठे परिश्रम घेतले. ही सर्व कार्यवाही होण्यासाठी काही काळ लागणार होता.
२ प्रकल्पांना मंजुरी – त्यानुसार सर्व किचकट प्रक्रिया एकदाची पूर्ण झाली व त्या जागी बडे प्रकल्प आणण्याचा ना. उदय सामंत यांचा मार्ग मोकळा झाला. त्या जागेवर तब्बल २९५५० कोटींच्या गुंतवणुकीच्या २ बड्या प्रकल्पांना आजच मंत्रिमंडळाच्या उपसमितीने मंजुरी दिली व या दोन्ही प्रकल्पांचा आता मार्ग मोकळा झाला.
२ बडे प्रकल्प – इलेक्ट्रॉनिक्ससाठी लागणाऱ्या सिलीकॉन वेफर्स आणि चिप्स’ च्या निर्मितीत अग्रेसर असलेल्या वेल्लोर इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क प्रा. लि.’ या कंपनीचा तसेच ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.’ या दोन कंपन्यांच्या बड्या प्रकल्पांना आज मंत्रिमंडळाच्या उपसमितीने मंजुरी दिली.
स्टरलाईच्या जमिनीवर – ‘वेल्लोर इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी प्रा. लि.’ हा उच्च तंत्रज्ञानाव्र आधारीत प्रकल्प असून त्यामध्ये ‘सिलीकॉन वेफर्स आणि चिप्स’चे उत्पादन केले जाईल. या उत्पादनांना जागतिक स्तरावर फार मोठी मागणी असते. रत्नागिरीकरांनी हाकलवून लावलेल्या स्टरलाईट कंपनीच्या ५५० एकर जागेवर हा प्रकल्प उभा राहील.
इलेक्ट्रॉनिक्स ग्रीन प्रोजेक्ट – या प्रकल्पामध्ये सुमारे १९५०० कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक होणार असून त्यामुळे ५६२० प्रत्यक्ष तर २८००० अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. इलेक्ट्रॉनिक सेमी कंडक्टर क्षेत्रात देशाला स्वावलंबी बनविण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करीत आहे. त्यासाठी हा प्रकल्प सहाय्यभूत ठरेल.
इलेक्ट्रॉनिक उपकरणे – तसेच ‘रिलायन्स इन्फ्रस्ट्रक्चर लि.’या दुसऱ्या बड्या प्रकल्पालाही मंत्रिमंडळाच्या उपसमितीने आज मंजुरी दिली. संरक्षण क्षेत्राला लागणाऱ्या शस्त्र सामुग्रीच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती करणाऱ्या या प्रकल्पासाठी सुमारे १० हजार कोटींची गुंतवणूक होईल तर त्यातून ४५०० प्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील.
ना. उदय सामंतांची चिकाटी – स्टरलाईट कंपनीची जागा कंपनीकडून परत मिळावी यासाठी बराच काळ प्रयत्न करावे लागले. हे सारे प्रयत्न ना. उदय सामंत यांनी संयमाने व चिकाटीने केले त्यामुळेच आज त्या जागेवर हे २ बडे प्रकल्प येऊ घातले आहेत. या २. बड्या प्रकल्पांना आज मंत्रिमंडळाच्या उपसमितीने मंजुरी दिली व या प्रकल्पांचा मार्ग मोकळा झाला.