27.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriगणपतीपुळे दोन ठिकाणी “नो स्विमिंग झोन”

गणपतीपुळे दोन ठिकाणी “नो स्विमिंग झोन”

कोरोनामुळे सध्या मंदिरे बंद आहेत. पर्यटनाला जरी रोख लागली असली तरी गणपतीपुळे येथे पर्यटकांचा ओघ सुरुच आहे.

रत्नागिरीतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ असलेले श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे कायमच भाविकांची गर्दी ओसंडून वाहत असते. परंतु, बाहेरून पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज नसल्याने, आणि भरती-ओहोटी बाबत अज्ञान असल्याने पाण्यात उतरण्याचा मोह न आवरल्याने, हा उत्साह कधीतरी जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरवर्षी गणपतीपुळे समुद्रकिनारी अशा अज्ञानी पर्यटकांचा समुदाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू होण्याचे प्रकार घडत आहेत. असे अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी आता देवस्थान, ग्रामपंचायत आणि पोलिसांच्यावतीने विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

कोरोनामुळे सध्या मंदिरे बंद आहेत. पर्यटनाला जरी रोख लागली असली तरी गणपतीपुळे येथे पर्यटकांचा ओघ सुरुच आहे. सध्या समुद्राला उधाण आले असल्याने, खवळलेला समुद्रामध्ये नवख्याने पोहणे धोकादायक बनू शकत. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गणपतीपुळे ग्रामपंचायत, जयगड पोलिस ठाणे, आणि देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चा झाली आणि बैठकीनंतर दोन दिवसामध्ये उपाययोजना  केली गेली.

पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू होऊ नये यासाठी जिथे पोहण्यास धोका आहे अशा दोन ठिकाणी लाल रिबिन लावून “नो स्विमिंग झोन”  बनवण्यात आले आहेत. भरतीच्यावेळी पाण्यामध्ये चाळ म्हणजे खडयासारखा प्रकार निर्माण होऊन, त्यामध्ये पर्यटक गुंफून अडकून जाऊन बुडतात. त्यामुळे पोहणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हे झोन बनवले गेले असून, किनाऱ्यापट्टीवर ग्रामपंचायतीमार्फत दहा जीवरक्षकांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.

भरती-ओहोटीच्या वेळेनुसार समुद्रात खड्डा तयार होतो आणि त्यात पर्यटक सापडल्यास अशी दुर्घटना घडू शकते. मंदिराच्या समोरील शंभर मीटरच्या भागामध्ये लाल झेंडे रोवून पर्यटकांना कळावे यासाठी रिबीन्स लावण्यात आल्या आहेत. एटीडीसीच्या मागील बाजूसही या पध्दतीने झोन बनविण्यात येणार आहे. वॉच टॉवरजवळही असे अनेक प्रकार घडतात. त्या भागाचा समावेशही नो स्विमिंग झोनमध्ये केला गेला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular