29.7 C
Ratnagiri
Wednesday, February 5, 2025

राजापूर पालिकेच्या गोठ्याची दुरवस्था

तीव्र उतार आणि नागमोड्या वळणांच्या राजापूर शहरातील...

गावाचा सर्वांगीण विकास करणार – आ. शेखर निकम

गावाच्या विकासासाठी निधी, योजना आणि आवश्यक सुविधा...
HomeRatnagiriमिरकरवाडा बंदरात ३०० अनधिकृत बांधकाम

मिरकरवाडा बंदरात ३०० अनधिकृत बांधकाम

अनधिकृत बांधकामांना अनेकदा नोटीस बजावण्यात आली होती.

मिरकरवाडा बंदराच्या अकरा हेक्टर जागेवर कोट्यवधी रुपये खर्च करून हे बंदर विकसित केले जात आहे. या बंदरात कच्चीपक्की अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत तसेच माशांची जाळी, नौकांचे इतर सामान, सुके मासे आणि खारवून ठेवलेल्या माशांनी परिसरातील जागा व्यापलेली आहे. बंदरामध्ये सुमारे ३०० पेक्षा जास्त अनधिकृत बांधकामे असून, ती तत्काळ खाली (रिकामी) करा, अशी नोटीस मत्स्य विभागाने बजावली आहे. मिरकरवाडा बंदराच्या विकासासाठी दुसऱ्या टप्प्याच्या कामात अडथळा येऊ नये यासाठी तेथील अनधिकृत बांधकामे त्वरित हटवण्यात यावीत, अशी नोटीस मत्स्य व्यवसाय विभागाकडून संबंधितांना बजावण्यात आली आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांची धावपळ झाली आहे. मिरकरवाडा बंदराच्या ११ हेक्टर जागेवर कोट्यवधी रुपये खर्च करून हे बंदर विकसित करण्यात येत आहे.

या बंदरामध्ये ३०० ट्रॉलर्स आणि २०० पर्ससीन नौका अशा एकूण ५०० नौका उभ्या राहतील, असे सुसज्ज बंदर येथे उभारण्यात येणार आहे. हे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. शासनाने त्यासाठी निधीही मंजूर केला आहे. यासाठी बंदरातील जागा मोकळी करून देणे आवश्यक आहे. मिरकरवाडा बंदरात ३०० अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली आहेत. या बांधकामांमध्ये माशांची जाळी, नौकांचे इतर सामान, सुके मासे, खारवून ठेवलेले मासे ठेवले जातात तसेच माशांची खरेदी-विक्री येथूनच करण्यात येते. गेल्या कित्येक वर्षांपासून ही बांधकामे उभारण्यात आली आहेत. मत्स्य विभागाकडून अनेकदा नोटीस बजावण्यात आली आहे; मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून ती बांधकामे “जैसे थे आहेत. मिरकरवाडा बंदराच्या विकासाचा टप्पा-२ चे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी ही अनधिकृत बांधकामे तत्काळ हटवण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

यापूर्वी झाली होती कारवाई – मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामांना अनेकदा नोटीस बजावण्यात आली होती. त्याचबरोबर ऑक्टोबर २०२३ मध्ये मिरकरवाडा बंदरावरील अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली होती. ही कारवाई मत्स्यविभाग, पालिका यांच्याकडून पोलिस संरक्षणात करण्यात आली होती. या कारवाईनंतर पुन्हा पक्की व कच्ची अनधिकृत बांधकामे पुन्हा त्याच जागेवर उभी करण्यात आली आहेत. त्यामुळे मत्स्य विभागाने तत्काळ अनधिकृत बांधकामे हटवण्यास सांगितले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील कामे – मिरकरवाडा बंदरामध्ये दुसऱ्या टप्प्यात नौका दुरुस्ती, लिलावगृह, मच्छीमारांना विश्रांतीसाठी शेड, जाळी विणण्यासाठी शेड, अंतर्गत रस्ते, नौका दुरुस्ती सुविधा, उपाहारगृह, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, सुरक्षारक्षक चौकी अशी विविध कामे या दुसऱ्या टप्प्यांतर्गत प्रस्तावित करण्यात आली आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular