26.9 C
Ratnagiri
Wednesday, July 17, 2024

रत्नागिरी मिरकरवाडा मच्छीमार्केटची दुरवस्था

शहराजवळील मिरकरवाडा येथील मच्छीमार्केटची अवस्था दयनीय झाली...

घनकचरा प्रकल्पाला ५ एकर जागा – उदय सामंत

रत्नागिरी पालिकेचा घनकचरा प्रकल्पाच्या जागेचा प्रश्न अखेर...

परशुरामनगर भागात पुराची नवी समस्या, महामार्ग विभागाचे दुर्लक्ष

ओझरवाडी डोंगरातील पावसाचे पाणी महामार्गच्या गटारांमध्ये न...
HomeKhedपंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस सोडणार

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस सोडणार

महिला सन्म ान योजना', यासारख्या सरकारच्या सवलत योजना लागू राहणार आहेत.

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी वारकरी दरवर्षी ‘विठू नामाचा जयघोष’ करीत श्री श्रेत्र पंढरपूरला जातात. या वारकऱ्यांच्या सोयीसाठी यात्राकाळात एसटी प्रवाशांसाठी पाच हजार विशेष जादा गाड्या सोडण्याचा निर्णय एसटी, महामंडळाने घेतला आहे. विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी ग्रुप बुकिंग केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

सालाबादप्रमाणे श्री क्षेत्र पंढरपूरला आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनाला येतात. अनेक प्रवासी स्वतःच्या खाजगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखींबरोबर पायी चालत दिंडीने येत असतात. या प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस. सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ४० पेक्षा जास्त भाविकांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. अर्थात या प्रवासात देखील ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास देणारी ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सूट देणारी ‘महिला सन्म ान योजना’, यासारख्या सरकारच्या सवलत योजना लागू राहणार आहेत.

यात्रा काळांमध्ये गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे, वाहकांकडून तिकीट मागून न घेणे अशाप्रकारे प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गावर १२ ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे अशा फुकट्या प्रवाशांना अटकाव करण्यासाठी एसटीचे २०० सुरक्षा कर्मचारी आणि अधिकारी यात्रा काळात २४ तास नजर ठेवून असणार आहेत. एकादशीच्या दिवशी लाखो भाविक प्रवासी आपल्या गावाकडे मार्गस्थ होतात. अशावेळी रस्त्यावरं वाहतूक कोंडी होऊन प्रवासाचा खोळंबा होतो.

यंदा स्थानिक पोलीस प्रशासनाच्या खांदयाला खांदा लावून ३६ पेक्षा जास्त वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काम करणार आहेत.. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी एसटी पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular