पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ सालामध्ये काळ्या पैसा देशातून हद्दपार करण्यासाठी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये रात्री ८ च्या दरम्यान अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानंतर चलनामध्ये नवीन ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा आणण्यात आल्या. या नोटांसह १०,२०,५०,१०० आणि २०० रुपयांच्या नोटाचेही रुपडे पालटून त्या बाजारात आणल्या. त्यावेळी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर #notebandi हा ट्रेंड सुरु झाला होता.
सत्ताधारी आणि विरोधक आपापली मतं दर्शवतच होतेत आणि अजूनही आहेतच. २०१४ साली सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक धडाडीचे निर्णय घेतले. यापैकीच एक प्रमुख निर्णय म्हणजे नोटबंदी करणे हाच होय. या निर्णयाला आज पाच वर्ष पूर्ण होत आहेत.
८ नोव्हेंबर २०१६ रोजी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. या निर्णयाला आजच्या सोमवारी पाच वर्ष पूर्ण होत आहेत. नोटबंदीच्या निर्णयामुळे देशातील भ्रष्टाचार, काळापैसा हद्दपार होईल, दहशतवादी कारवायांना लगाम बसेल, असा ठामपणे दावा मोदींनी केला होता. परंतु त्याला किती यश आले कि नाही आले याबद्दल चर्चा मसलत सुरु आहे. विरोधकांनी मात्र या नोटबंदीच्या निर्णयावर कडाडून टीका केली. पण त्यावेळी बाद केलेल्या नोटांपैकी तब्बल ९९ टक्के नोटा बँकेमध्ये जमा झाल्या होत्या.
विरोधकांनी मोदींच्या या नोटबंदीच्या अचानक घेतलेल्या निर्णयावर सडकून टीका केली होती. आणि आजही केली जाते आहे. विरोधकांनी स्वातंत्र्य भारतात घेण्यात आलेला हा सर्वात चुकीचा निर्णय असल्याचं मत व्यक्त केलं होतं. पण भाजपकडून विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर देण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक नोटबंदी केल्यानंतर सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागला होता. अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम झाला होता. मागणी घसरल्याने, उद्योग -व्यवसायालाही फटका बसला होता. त्या आर्थिक वर्षात जीडीपी सुद्धा १.५ टक्क्यांनी घसरला होता.