तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करण्यत आले. मात्र तालुक्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. प्रशासनाकडे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठीच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. आतापर्यंत १० गावांतील वाड्यांनी टँकरसाठी अर्ज केले आहेत. मागील महिन्यात आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत पंचायत समितीत टंचाईग्रस्त कृती आराखडा तयार करण्यासाठी बैठक झाली. यावेळी तहसीलदार प्रवीण लोकरे, गटविकास अधिकारी उमा घार्गे पाटील व पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील ४३ गावांतील २३१ वाड्यांत अवघ्या २ टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी २८ लाख १० हजारांची तरतूद केली. तालुक्यातील ५२ गावे आणि २४७ वाड्यांचा टंचाईग्रस्त आराखड्यात समावेश करण्यात आला आहे.
या टंचाईग्रस्त आराखड्यामध्ये कळकवणे, कोसबी, तर टेरव व कळवंडेमधील सर्वच वाड्या टंचाईग्रस्त आहेत. करंबवणे, आगवे लिबेवाडी, हुमणेवाडी, मधलीवाडी, अनारी, कोळकेवाडी धनगरवाडी, कळकवणे धनगरवाडी, कामथे बुद्रुक, कदमवाडी, खेर्डी, कामथे खुर्द धनगरवाडी, गुढे, तुरंबव रामवाडी, शिरवली वेलोंदेवाडी, परशुराम पायरवाडी, अडरे, कोंडमळा, सावर्डा, येथील सर्वच वाड्या टंचाईग्रस्त आहेत. नारदखेरकी वीर जावळेवाडी, भोईवाडी व उपकेंद्र, कादवड, पालवण मधील सर्व वाड्या, आकले बौद्धवाडी, चोरगेवाडी, गजमलवाडी, कांगणेवाडी, डेरवण खालची बौद्धवाडी, धनगरवाडी, फौजदारवाडी, गवळवाडी एक व दोन, गुजरवाडी, शिर्केवाडी, चव्हाणवाडी, डेरवण खुर्द सुतारवाडी, बौद्धवाडी, पोफळीमधील ऐनाचेतळे, होडेवाडी, करंजावडेवाडी, मानकरवाडी, पंडववाडी, पोफळी कॉलनी, पोफळी नाका, सरफरेवाडी, कातकरवाडी, पोफळी बुद्रुक बौद्धवाडी, पवारवाडी, तांबडवाडी, सुतारवाडी, सय्यदवाडी दोन व सय्यदवाडी तीन, तळसरमधील सर्व वाड्या, तिवडीमधील चोरगेवाडी, खालचीवाडी, उगवतवाडी, बौद्धवाडी.
तिवरेमधील हेलणवाडी, गावठाण व सुतारवाडी, रेहेळभागाडीमधील सकपाळवाडी, मूर्तवडे कुटलवाडी, खडपोली गोकुळवाडी, नांदीवसे स्वयंदेव व राधानगर, रिक्टोली संपूर्ण गाव, मिरजोळीमधील साखरवाडी, कदमवाडी, चर्मकारवाडी, पवारवाडी, महालक्ष्मीनगर, पाचाडमधील घोलेवाडी, बुरूवाडी, निवळीमधील राऊळवाडी, बौद्धवाडी, काजारेवाडी, कोदारेवाडी, खांबेवाडी, कातळवाडी, कात्रोळी, मुढेतर्फे सावर्डा आदी गावे आणि तेथील वाड्यांचा टंचाईग्रस्त म्हणून समावेश आहे. धनगरवाड्यांप्रमाणेच तालुक्यातील इतर गावांनाही पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. यामुळे प्रशासनाकडे टँकरसाठीच्या दिलेल्या अर्जामध्ये वाढ होऊ लागली आहे. यामध्ये नारदखेरकी, कोसबी, करंबवणे-बंदरवाडी, बौद्धवाडी, पाचाड, डेरवण, अनारी, कादवड आदी गावांचा समावेश आहे.
२० लाख ४० हजारांची तरतूद – प्रस्तावित टंचाईग्रस्त आराखड्यात १३ गावांमधील १७ वाड्यांत नवीन विंधण विहिरींना मंजुरी दिली. त्यासाठी २० लाख ४० हजार रुपयांची तरतूद केली.