28.2 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeEntertainmentआदिनाथ कोठारे, पहिल्या मराठी अभिनेत्याच्या सिनेमाचा ट्रेलर बुर्ज खलिफावर

आदिनाथ कोठारे, पहिल्या मराठी अभिनेत्याच्या सिनेमाचा ट्रेलर बुर्ज खलिफावर

मराठी सिनेसृष्टीत गेली काही वर्ष यशस्वी करिअर करत असलेल्या आदिनाथ कोठारे २४ डिसेंबरला एका विशेष चित्रपटाद्वारे बॉलिवूड विश्वात पदार्पण होत आहे. कबीर खान दिग्दर्शित ’83’ या चित्रपटामधून क्रिकेटर दिलीप वेंगसरकर ह्यांची भूमिका वठवताना आदिनाथ कोठारे आपल्या अभिनयाचा ठसा उमटवताना दिसेल. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच जगातील सर्वात उंच इमारतीवर, दुबईच्या बुर्ज खलिफावर दाखवण्यात आला आहे.

आदिनाथ कोठारे हा पहिला मराठी अभिनेता-दिग्दर्शक ठरला आहे,  ज्याचा ट्रेलर बुर्ज खलिफावर दाखवण्यात आला आहे. ही गोष्ट नक्कीच त्याच्या आणि त्यांच्या चाहत्यांसाठी अभिमानाची बाब आहे. अभिनेता आदिनाथ कोठारेने आपल्या कारकिर्दीत अनेक यशस्वी वाटचाल केली आहे. २०२१ हे वर्ष आदिनाथ कोठारेसाठी करिअरच्या दृष्टीने अतिशय अविस्मरणीय वर्ष ठरलं आहे असं म्हटल तर वावग ठरणार नाही.

यंदा आदिनाथला ‘पाणी’ चित्रपटासाठी सर्वोच्च मानला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. यावर्षी आदिनाथने डिजिटल विश्वात ‘सिटी ऑफ ड्रिम्स’ या वेब सीरिजव्दारे पदार्पण करत आपला वेगळा ठसा उमटवताना दिसणार आहे.

याविषयी आदिनाथला याबद्दल विचारणा केली असता, आपल्या भावना व्यक्त करताना आदिनाथ म्हणाला कि,  “मी खरच खूप भावूक झालो आहे. जगातल्या सर्वात उंच इमारतीमध्ये आपला चेहरा जगाला दिसणं हे कोणत्याही अभिनेत्यासाठी निश्चितच आनंददायी गोष्ट आहे.

83 चित्रपटाचा ट्रेलर बुर्ज खलिफावर दाखवल्यापासून मला माझ्या कुटूंबाचे, मित्र परिवारांचे, चाहत्यांचे अभिनंदन करणारे भरपूर मेसेज येत आहेत. जगभरातून सध्या माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आपल्या कुटूंबाला–चाहत्यांना आपला गर्व वाटावा,  असं काही तरी करायला मिळणं हे प्रत्येक अभिनेता-दिग्दर्शकासाठी गौरवास्पद गोष्ट आहे.”

RELATED ARTICLES

Most Popular