27.2 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeChiplunपूरप्रवण क्षेत्रांना जिल्हा पोलीस अधीक्षकांची प्रत्यक्ष भेट, सतर्क राहण्याचे आवाहन

पूरप्रवण क्षेत्रांना जिल्हा पोलीस अधीक्षकांची प्रत्यक्ष भेट, सतर्क राहण्याचे आवाहन

आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी काय सावधगिरी बाळगली पाहीजे व काय केले पाहीजे याबाबत आवश्यक ते मार्गदर्शन केले.

रत्नागिरी जिल्हयात सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे आणि नद्यांनी काही प्रमाणात पाण्याची पातळी ओलांडल्यामुळे या पार्श्वभुमीवर रत्नागिरी जिल्हयाचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी चिपळुण, पर्शुराम घाट, खेड येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून भेट दिली. जुलै २०२१ मध्ये चिपळुण येथे आलेल्या महापुरामध्ये पुर, दरड कोसळणे वगैरे घटनांमुळे अनेक लोकांची घरे उध्वस्त होवुन खूप मोठया प्रमाणात वित्त हानी आणि जीवीतहानी सुध्दा झाली होती झाली होती. या घटनेच्या अनुषंगाने यंदाच्या वर्षी खबरदारी म्हणुन चिपळूण बाजारपेठ, परशुराम घाट, पेठमाप, गोवळकोट तसेच खेड पोलीस ठाण्याचे हद्दीमध्ये बाजारपेठ व मच्छिमार्केट इत्यादी पूरप्रवण क्षेत्राला भेट दिली.

सदर भेटीमध्ये पोलीस अधीक्षक यांनी तेथील नागरिकांशी प्रत्यक्ष भेटून, चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून  घेतल्या. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी काय सावधगिरी बाळगली पाहीजे व काय केले पाहीजे याबाबत आवश्यक ते मार्गदर्शन केले. तसेच खेड नगरपरिषद हॉल येथे खेड पोलीस ठाणे हद्दीतील बचाव पथके तसेच मदत करणारे नागरिक यांची मिटींग घेऊन संवाद साधला. बचाव कार्याकरीता तैनात करण्यात आलेल्या एन. डी. आर. एफ. टीम,  नौका दल, रेड फोर्स टिम यांच्याशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले.

तसेच अतिवृष्टी व पूर परिस्थितीत उपयुक्त ठरणाऱ्या संसाधनांचे प्रात्यक्षिक घेतले. तरी सर्व नागरिकांनी सतर्क व जागरुक रहावे, असे वारंवार आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी केले आहे. सदरवेळी पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांचेसमवेत उपविभागीय पोलीस अधिकारी, चिपळूण श्री. सचिन बारी, उपविभागीय पोलीस अधिकारी,  खेड श्री. शशीकिरण काशीद,  पोलीस  निरीक्षक श्री. रविंद्र शिंदे, पोलीस निरीक्षक श्रीमती निशा जाधव असे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular