23.3 C
Ratnagiri
Tuesday, February 4, 2025

राजापूर पालिकेच्या गोठ्याची दुरवस्था

तीव्र उतार आणि नागमोड्या वळणांच्या राजापूर शहरातील...

गावाचा सर्वांगीण विकास करणार – आ. शेखर निकम

गावाच्या विकासासाठी निधी, योजना आणि आवश्यक सुविधा...
HomeEntertainment'धर्मवीर' या चित्रपटाला अत्यंत मानाचा पुरस्कार, निर्मात्यांनी शेअर केली पोस्ट

‘धर्मवीर’ या चित्रपटाला अत्यंत मानाचा पुरस्कार, निर्मात्यांनी शेअर केली पोस्ट

हा पुरस्कार धर्मवीर आनंद दिघे साहेबांना समर्पित असल्याचे म्हटले आहे. चित्रपटाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष साथ देणा-या प्रत्येकाचे मंगेशने आभार व्यक्त केले आहेत.

‘धर्मवीर’ या चित्रपटाला ‘दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्कारा’ने चित्रपटाला सन्मानित करण्यात आले आहे. यासंदर्भात निर्माते मंगेश देसाई यांनी पोस्ट शेयर करून सर्वांचे आभार मानले आहेत. यामध्ये त्यांनी पुरस्कार हातात घेऊन आपलं फोटो शेयर केला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आणि सर्व कलाकार आणि रसिकांचे आभार मानले आहेत.

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर’ सिनेमा रिलीज होऊन दोन महीने झाले तरी अद्याप या सिनेमाची चर्चा थांबण्याचे नाव घेत नाही. धर्मवीर आनंद दिघें यांचं जीवनचरित्र पडद्यावर पाहण्यासाठी सिनेमागृहातही प्रेक्षकांनी गर्दी केली. प्रसाद ओकच्या अफलातून अभिनयाचे जितके कौतुक झाले तितकेच दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे झाले. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने उत्तम कमाई केलीच, शिवाय आता पुरस्कारांवरही मोहोर उमटवण्यात हा सिनेमा वरचढ ठरलेला आहे. एक अत्यंत मानाचा पुरस्कार या चित्रपटाला मिळाला आहे.

ठाणे शहर आणि जिल्ह्यात शिवसेना हा पक्ष रुजवणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनपट या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. १३ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून दाद मिळाल्याने बॉक्स ऑफिसवर चित्रपट दमदार कामगिरी करत सुपरहिट ठरला. त्यानंतर आता दादासाहेब फाळके एक्सलन्स अवॉर्ड या पुरस्काराने चित्रपटाला सन्मानित करण्यात आल्याने चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे.

चित्रपटाचा निर्माता मंगेश देसाईने एक पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यासोबतच त्याने हा पुरस्कार धर्मवीर आनंद दिघे साहेबांना समर्पित असल्याचे म्हटले आहे. चित्रपटाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष साथ देणा-या प्रत्येकाचे मंगेशने आभार व्यक्त केले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular