भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत असून, त्या निमित्ताने अनेक विविध योजना शासनामार्फत राबवल्या जात आहेत. विविध क्षेत्रांमध्ये विविध सवलती, विद्यार्थी, वृद्ध, महिला यांच्या साठी आवश्यक आणि गरजेच्या अशा विविध योजना राबवल्या जात आहेत. केंद्राने तर कारागृहातील विशेष कैद्यांसाठी देखील विशेष योजनेची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत विविध समाजोपयोगी जनसामान्यांच्या विकासासाठीच्या योजना सुरु केल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा या गौरवशाली पर्वानिमित्त आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत, केंद्र शासनाने अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत ११ ते १७ ऑगस्ट या कालावधीमध्ये देशभरात हर घर झेंडा हा उपक्रम राबवण्याचे निश्चित केले आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खेडेकर यांनी केले. राष्ट्रध्वज हि प्रत्येक देशाची शं असते. आणि भारताचा तिरंगा सर्व घरांवर फडकवून हे अमृत महोत्सवी वर्ष सदर व्हावे अशी संकल्पना आहे.
यासंबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी बैठक पार पडली. बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी देसाई, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नंदिनी घाणेकर आदी उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व शासकीय व निमशासकीय यंत्रणा, खाजगी आस्थापना, शाळा, महाविद्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, रूग्णालये, सहकारी संस्था व नागरिकांनी आपल्या घरावर तसेच इमारतीवर ११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रध्वज उभारण्याचा संकल्प केला आहे.