27.5 C
Ratnagiri
Tuesday, April 30, 2024

‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ फेम साईराजची टीव्ही मालिकेत एंट्री

मागच्या वर्षी गणेशोत्सवात सोशल मीडियावर एक गाणं...

…तर रिक्षा चालकांचा मतदानावर बहिष्कार – प्रताप भाटकर

मुक्त रिक्षा परवाना धोरणामुळे रिक्षा व्यावसायिक अडचणीत...

डेंजरझोनमधील मिऱ्या बंधाऱ्याचे काम ठप्प

पावसाचा हंगाम तोंडावर आला असला तरी डेंजरझोनमध्ये...
HomeKhedखेड तालुक्यातील राज्य पशुसंवर्धन खात्याच्या १७ दवाखान्यांची स्थिती बिकट

खेड तालुक्यातील राज्य पशुसंवर्धन खात्याच्या १७ दवाखान्यांची स्थिती बिकट

शेतकरी आणि पशुसंवर्धन विभागामधील प्रमुख दुवा असलेले पशुधन पर्यवेक्षक हेच पद ग्रामीण भागातील १६ दवाखान्यांमधून अद्याप रिक्त आहे.

राज्यात सध्या जनावरांवर लंपी त्वचा रोगाचा फैलाव होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील अनेक पशु वैद्यकीय दवाखान्यांना कोणी वालीच नसल्याने ग्रामीण भागातील पशुधनासाठी चिंतेची बाब ठरत आहे. खेड तालुक्यातील राज्य पशुसंवर्धन खात्याच्या १७ दवाखान्यांची स्थिती बिकट असून ती सुधारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

तालुक्यात खेड, लोटे, ऐनवरे, आंबवली, तळे, लवेल, आयनी, वेरळ,खवटी, मुरडे, शिवतर, धामणी, फुरूस, कोरेगाव, काडवली, धामणंद व आंबडस येथे पशुचिकित्सालय आहेत. त्यातील तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयात एकूण ५ च पदे मंजूर आहेत; मात्र त्यापैकी देखील एक पद रिक्त आहे. त्यामध्ये खेड येथे पशुधन पर्यवेक्षक हे एक पद रिक्त आहे तर तालुक्यातील राज्य शासनाच्या इतर १६ दवाखान्यांची स्थिती देखील दिवसेंदिवस नाजूक बनत चालली आहे.

शेतकरी आणि पशुसंवर्धन विभागामधील प्रमुख दुवा असलेले पशुधन पर्यवेक्षक हेच पद ग्रामीण भागातील १६ दवाखान्यांमधून अद्याप रिक्त आहे. याच १६ दवाखान्यातून परिचर हे पद तब्बल ७ ठिकाणी रिक्त आहे. सद्यःस्थितीत १६ दवाखान्यांतून ९ ठिकाणी तीन महिन्याच्या मुदतीवर कंत्राटी पद्धतीने पशुधन पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

खेड येथे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तालुका लघु पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून व्ही. बी. देशमुख म्हणून काम पाहत आहेत तर पशुधन विकास अधिकारी म्हणून डॉ. शुभांगी निंबोरे यांच्यासह एक लिपिक, एक परिचर अशा चार जणांवर खेडच्या पशुसंवर्धन दवाखान्याचा कारभार आहेत. तालुक्यात रिक्त पदांमुळे सध्या कार्यरत कर्मचार्‍यांवर कामाचा अधिक ताण पडत आहे. कोकणातील शेतकरी गरीब असला तरी त्याच्याकडे असलेल्या मर्यादित पशुधनाची तो जिवापेक्षा अधिक काळजी वाहत असतो.

त्यामुळे शहरी भागासह ज्यांना खर्च अशा सुविधांची आवश्यकता आहे अशा शासनाच्या पशुसंवर्धनासाठी असलेल्या विविध योजना व सुविधा डोंगरदर्‍यांमध्ये राहणार्‍या शेतकर्‍यांपर्यंत खर्‍या अर्थाने पोचवण्यासाठी राज्य पशुसंवर्धन खात्याने उभारलेल्या त्यांच्या या यंत्रणांसमोर असलेल्या समस्या सोडवणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES

Most Popular