26.4 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeMaharashtraखास. विनायक राउतांची, रामदास कदमांवर बोचऱ्या भाषेत टीका

खास. विनायक राउतांची, रामदास कदमांवर बोचऱ्या भाषेत टीका

रामदास कदम म्हणजे खरी गद्दारीची कीड आहे. जेव्हा नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा गद्दारी करण्यासाठी सर्वात पुढे रामदास कदम होते.

शिवसेना आणि निर्माण झालेला शिंदे गट यांच्यामधील वाद आणि आरोप प्रत्यारोप संपण्याचे चिन्ह दिसत नाही. जिथे जिथे संधी मिळेल तिथे दोन्ही गटातील अधिकारी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. तर शिवसेना मधून शिंदे गटामध्ये सामील झालेल्यांचा उल्लेख गद्दार आणि खोकेवाले असाच केला जात आहे.

रामदास कदम आणि त्यांचा मुलगा आम. योगेश कदम यांनी शिवसेनेला रामराम ठोकल्यानंतर खास. विनायक राउत यांनी तर त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. तेंव्हा बोलताना ते म्हणाले कि, रामदास कदम म्हणजे खरी गद्दारीची कीड आहे. जेव्हा नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा गद्दारी करण्यासाठी सर्वात पुढे रामदास कदम होते.

तेच सर्व आमदारांना बोलवत होते. स्वतः नारायण राणेंनी खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे रामदास कदम यांच्या टीकेला काडीचीही किंमत नाही अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांनी रामदास कदम यांच्यावर हल्लाबोल केला. त्यानंतर त्यांना दसरा मेळाव्याबाबत विचारणा केली असता, जसे उद्धव साहेबांनी सांगितले आहे कि यंदाचा दसरा मेळावा न भूतो न भविष्यती होणार, त्यासाठी शिवसैनिकांनी अतोनात परिश्रम घ्या. गद्दारीची कीड वेळीच ठेचली गेली पाहिजे. त्याप्रमाणेच शिवसैनिक उत्स्फुर्तपणे या दसरा मेळाव्यात सहभागी होणार आहेत असे खासदार राऊत म्हणाले.

शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा महाराष्ट्राचा दौरा ऑक्टोबरपर्यंत संपेल. त्यानंतर डिसेंबर महिन्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरु होईल असे राऊत यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular