25.9 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeRatnagiriवृद्धाला धडक देऊन, बोलेरो चालक फरार

वृद्धाला धडक देऊन, बोलेरो चालक फरार

मुंबई-गोवा महामार्गावरील कोळंबे येथील वळणावर बोलेरो चालकाने विरुद्ध दिशेला जाऊन दुचाकीला जोरदार धडक दिली.

रत्नागिरी मुंबई-गोवा महामार्गाची झालेली दुरवस्था सर्वज्ञात आहे. रस्त्याला पडलेले खड्डे आणि त्यामुळे उंचीमध्ये झालेला फरक आणि वाहन चालकांची बेदरकारपणे वाहतूक त्यामुळे अपघाताच्या मालिका सुरूच आहेत. अनेक वेळा असे बेदरकारपणे वाहन चालवून समोरच्याला गंभीर जखमी करून तिथून कोणतीही मदत न करता आणि पोलिसांचा ससेमिरा पाठीशी लागू नये यासाठी तिथून पळून जातात.

मुंबई-गोवा महामार्गावरील कोळंबे येथील वळणावर बोलेरो चालकाने विरुद्ध दिशेला जाऊन दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकी रस्त्याच्या बाहेर फेकली गेली. या धडकेत दुचाकीच्या मागील सीटवर बसलेल्या वयोवृद्धाला गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर बोलेरो चालक पळून गेला. परंतु, त्या वाहन चालकाबद्दल माहिती पुढील चेक पोस्टला कळवल्यावर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी त्याला साखरपा मुर्शी येथील चेक पोस्टवर अडवले.

घडलेले वृत्त असे कि, मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो चालकाने कोळंबे येथे रत्नागिरीहून संगमेश्वरच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला विरुद्ध दिशेला जाऊन जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार संकेत परशुराम पंडित वय २६, सोनगिरी हा किरकोळ जखमी झाला,  तर त्याच्या मागे बसलेले राजाराम पंडित वय ६०, सोनगिरी असे दोघेजण जखमी झाले.

राजाराम यांच्या हाता-पायाला जबर मार लागला होता. अपघातानंतर स्थानिकांनी या ठिकाणी गर्दी केली, मात्र गर्दी झालेली पाहून बोलेरो चालक धडक देऊन फरार झाला. रस्त्यावर पडलेल्या त्या जखमी वृद्धाला लगेचच रत्नागिरी येथे उपचारासाठी हलवण्यात आले. हाता पायाला मार लागल्यामुळे, ते रस्त्यात पडून होते, पण आजूबाजूच्या लोकांनी ताबडतोब त्यांना रत्नागिरीमध्ये उपचारासाठी धाडले.

RELATED ARTICLES

Most Popular