26.5 C
Ratnagiri
Friday, December 19, 2025

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार विशेष गाडया

ख्रिसमसची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येणाऱ्या...

बेकायदेशीर वाळू उपसा होताना दिसल्यास कारवाई होणार – जिल्हाधिकारी आक्रमक

बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबत आलेल्या तक्रारीवरून आम्ही संगमेश्वरमध्ये...

रत्नागिरी शहरात भरवस्तीत बिबट्याच्या संचाराने घबराट

रत्नागिरी शहराच्या अगदी मध्यवर्ती आणि रहिवासी भाग...
HomeSindhudurgकेवळ नाहक त्रास देण्यासाठी, वैभव नाईकांच्या मागे अँटी करप्शन ब्युरो

केवळ नाहक त्रास देण्यासाठी, वैभव नाईकांच्या मागे अँटी करप्शन ब्युरो

‘शिंदे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून नाईकांवर दबाव टाकण्यासाठी अँटीकरप्शन ब्युरोकडून चौकशी लावली आहे.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ वाऱ्यावर सोडून दीपक केसरकर मंत्रिपदासाठी शिंदे गटात गेले; मात्र सिंधुदुर्गातील शिवसैनिक शिवसेनेबरोबरच राहिले आहेत. आमदार वैभव नाईक शिवसेनेत निष्ठेने राहिल्याने त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी अँटी करप्शन ब्युरोच्या नावाखाली त्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र जिल्ह्यात केवळ वैभव नाईकच उद्योगपती आहेत का? असा सवाल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

जिल्हाप्रमुख पडते यांनी शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, शिवसेना नेते अतुल बंगे, आबा सावंत, एकनाथ नारोजी आदी उपस्थित होते. पडते पुढे म्हणाले, ‘‘शिंदे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून नाईकांवर दबाव टाकण्यासाठी अँटीकरप्शन ब्युरोकडून चौकशी लावली आहे. आमदार नाईक यांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे; मात्र अशा धमक्यांना ते भीक घालणार नाही. नाईक दहशतवादाला बळी पडले नाहीत. त्यांनी कायमच दहशतवादाविरोधात लढा दिला आहे.

दि. १८ रोजी सकाळी साडेदहा वाजता अँटी करप्शन ब्युरोच्या कार्यालयाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये खासदार अजिंक्य सावंत, उपनेते गौरीशंकर खोत, माजी मंत्री व आमदार भास्कर जाधव, अरुण दुधवडकर, प्रवीण भोसले यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. जिल्ह्यातील शिवसैनिक व महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी देखील आपले वर्चस्व दाखवण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

पडते म्हणाले, ‘‘कोकणातील जनता पहिल्यापासून पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अतोनात प्रेम करणारी आहे. मुंबईत देखील कोकणी माणसाला मोठे करण्याचे काम शिवसेनेने केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिक अजून शिवसेनेबरोबरच आहेत. जिल्ह्यातील शिवसैनिकांना पैशाचे आमिष दाखवून आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला जात असला तरी, ज्यांच्यावर शिवसेनेचे संस्कार झालेले आहेत ते कार्यकर्ते या आमिषाला बळी पडणार नाहीत असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

Most Popular