24.6 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeSindhudurg'ये परफेक्ट है' नितेश राणेंच्या लक्षवेधी ट्वीटने खळबळ

‘ये परफेक्ट है’ नितेश राणेंच्या लक्षवेधी ट्वीटने खळबळ

आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जागी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेली नोट शेअर केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेली दोनशे रूपयांची नोट शेअर केली आहे. आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जागी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेली नोट शेअर केली आहे. त्याला राणे यांनी ‘ये परफेक्ट है’ अशी कॅप्शन दिली आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. नोटेवर असलेले राष्ट्रपिता गांधींचे छायाचित्र यावरून अनेकवेळा गदारोळ होऊन, त्यावर अनेकदा विविध तर्कवितर्क लढवण्यात आले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर गांधींजींच्या फोटोसह लक्ष्मी आणि विघ्नहर्त्या गणेशाचा फोटोही असावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे देशासह राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, कणकवलीचे भाजप नेते नितेश राणे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जागी थेट छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेली नोटचा फोटो शेअर केल्याने, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. केजरीवाल यांच्या या विधानाचा संबंध थेट गुजरात निवडणुकीशी लावला जात असून केजरीवाल गुजरातमध्ये हिंदुत्वाचं कार्ड खेळणार असल्याचं बोललं जात आहे.

केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझी विनंती आहे की, त्यांनी भारतीय चलनावर एका बाजूने महात्मा गांधी आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी तसेच गणेशाची प्रतिमा छापावी. सर्वच नोटा बदलाव्यात असं आम्ही म्हणत नाही. पण ज्या नोटा छापल्या जाणार आहेत, त्यावर लक्ष्मी आणि गणेशाची प्रतिमा असावी, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोची मागणी केली आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्याला नवीनच वळण आल्याचे समोर आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular