27.9 C
Ratnagiri
Sunday, August 10, 2025

गणेशोत्सवासाठी येणाऱ्या कोकणवासियांना सुविधा केंद्र – सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

गणेशउत्सवासाठी गावी येणाऱ्या कोकणवासियांसाठी सुविधा केंद्र देण्यात...

सिंधुदुर्गात पुन्हा ‘लम्पी’चा प्रकोप…

दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील पशुपालकांचे कंबरडे मोडलेल्या 'लम्पी...

समुद्र शांत झाल्याने मच्छीमार आनंदात…

वातावरणाने साथ न दिल्यामुळे मासेमारी बंदी उठूनही...
HomeEntertainmentलग्नाआधी माझी नात आई झाली तर.....!! जया बच्चन

लग्नाआधी माझी नात आई झाली तर…..!! जया बच्चन

जया सांगतात की, कोणतेही नाते दीर्घकाळ टिकण्यासाठी शारीरिक आकर्षण आणि शारीरिक संबंध खूप महत्त्वाचे असतात.

जया बच्चन यांनी सांगितले आहे की, लग्नाआधी त्यांची नात आई झाली आहे यात मला काहीच अडचण नाही. जया तिची नात नव्या नवेली नंदा हिच्या पॉडकास्टमध्ये जीवनातील अनेक पैलूंबद्दल बोलतात. जया सांगतात की, कोणतेही नाते दीर्घकाळ टिकण्यासाठी शारीरिक आकर्षण आणि शारीरिक संबंध खूप महत्त्वाचे असतात. त्यांच्या काळात त्यांनी हे सर्व अनुभवले नाही, असेही जया सांगतात. जीवनात भौतिक पैलूंचाही विचार केला पाहिजे, असे त्यांचे मत आहे.

तिच्या पॉडकास्टमध्ये तिची नात नव्या हिच्याशी बोलताना जया म्हणाली- “कदाचित लोक माझ्यावर आक्षेप घेत असतील, पण माझे असे मत आहे की, कोणतेही नाते दीर्घकाळ टिकण्यासाठी शारीरिक संबंध आणि शारीरिक आकर्षण हे खूप महत्त्वाचे असते. या पिढीमध्ये आम्हाला या सर्व गोष्टी कधीच जाणवल्या नाहीत. पण आजच्या मुलांनी हा प्रयोग केला तर काय हरकत आहे. मला वाटतं, जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल तर तुम्ही आरामात लग्न करावं आणि लग्न करण्यापूर्वी मूल व्हायला हरकत नाही.”

जया पुढे संभाषणात म्हणाल्या- “माझी पिढी असो किंवा श्वेता, आम्ही याचा विचारही करू शकत नव्हतो, पण जेव्हा नव्याच्या वयाची मुलं या अनुभवातून जातात तेव्हा त्यांना कुठेतरी अपराधी वाटतं. हे पाहून मला खूप वाईट वाटतं. आजकालच्या मुलांमध्ये भावना आणि रोमान्सचा अभाव आहे, म्हणून मला वाटते की आजच्या मुलांनी त्यांच्या सर्वात चांगल्या मित्राशी लग्न केले पाहिजे कारण प्रथम एकमेकांना समजून घेणे खूप महत्वाचे आहे.

या सर्व गोष्टी जया यांनी आपल्या नातवंड नव्या नवेली नंदा आणि श्वेता बच्चन नंदा यांच्यासोबत एका पॉडकास्टमध्ये सांगितल्या. जया यांचे १९७३ मध्ये अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न झाले होते, त्यानंतर त्यांना श्वेता आणि अभिषेक ही दोन मुले झाली.

RELATED ARTICLES

Most Popular