28.5 C
Ratnagiri
Saturday, November 23, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriखेड तालुक्यातील शेलारवाडी-वाकी प्रकल्पातून गळती

खेड तालुक्यातील शेलारवाडी-वाकी प्रकल्पातून गळती

धरणाच्या पायथ्याशी वाहणारे झरे ही धरणाची गळती आहे की ड्रेनेज लाईन याबाबत पाहणी करुन चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामधील तिवरे धरण दुर्घटनेनंतर कोकणातील धरणांच्या सुरक्षेविषयी जास्तच काळजी वाटू लागली आहे. जिल्ह्यामध्ये पूर्ण असलेल्या धरण प्रकल्पांमधील निम्मी धरणं नादुरुस्त आणि गळकी बनत चालली आहेत. आता यामध्ये आणखी एका धरणाची भर पडली आहे.

खेड तालुक्यातील माणी इथल्या शेलारवाडी-वाकी प्रकल्पातून गळती सुरु झाल्याचं वृत्त समोर आले आहे. धरणाच्या बंधाऱ्याची मुख्य भिंतीलाही गळती लागली असून पाटबंधारे विभागाने हे धरण फुटू नये, म्हणून मर्यादितच पाणी साठा करायला सुरुवात केली आहे. या धरणाची पाणी साठवण उंचीची क्षमता ८४ तालांका आहे. मात्र धरणफुटीच्या भीतीने आता प्रत्यक्षात या धरणात ७० तालांकापेक्षा जास्त पाणी साठवलं जात नाही, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

वाकी नदीवर २००२ मध्ये शेलारवाडी लघुपाटबंधारे प्रकल्पाचे काम सुरु झाले. हे धरण २०१३ मध्ये पूर्ण झालं. या प्रकल्पाद्वारे २०१४-१५ मध्ये पाणी अडवण्याचं काम सुरु करण्यात आलं. २०१९ पर्यंत धरण प्रकल्पामध्ये पाणी अडवण्याचं काम चालू होतं. धरणात पाणीसाठा होत असल्याने ऐनवरे, माणी, सवेणी, हेदली, वेरळ आणि लवेल या सहा गावांची पाणीटंचाई दूर झाली होती. दरम्यान या धरणाचं काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप करण्यात येत होता.

दोन वर्षांपूर्वी या धरणाच्या मुख्य बंधाऱ्यामधून पाणी झिरपून मोठी गळती सुरु झाली होती. त्यानंतर धरणासमोर असलेल्या माणी बौद्धवाडीला धोका निर्माण होऊ नये म्हणून धरणाचा पाणीसाठा मर्यादित प्रमाणात साठवायला सुरुवात झाली. आता धरणाच्या मुख्य बंधाऱ्याच्या पायथ्याशी पाच ते सहा ठिकाणी पाण्याचे झरे वाहू लागले असून गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. धरणाच्या पायथ्याशी वाहणारे झरे ही धरणाची गळती आहे की ड्रेनेज लाईन याबाबत पाहणी करुन चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular