27.2 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeKokanकोकणात शेती पंपाची भरमसाट विजबिले पाहून, बागायतदार हवालदिल

कोकणात शेती पंपाची भरमसाट विजबिले पाहून, बागायतदार हवालदिल

पश्चिम महाराष्ट्र व विदर्भामध्ये बागायतदाराच्या बिलांमध्ये सवलत दिली जाते. मग कोकणावर अन्याय का,असा प्रश्न शौकत मुकादम यांनी उपस्थित केला.

कोकणचा कॅलिफोर्निया झाला पाहिजे, असे कोकणचे नेते माजी खासदार गोंविदराव निकम, माजी आमदार नाना जोशी,माजी मंत्री बाळासाहेब सावंत यांचे स्वप्न होते. परंतु हे स्वप्न अद्याप सत्यात उतरेलेले नाही, शेती पंपावर भरमसाट बिले आकारली जात आहेत. हे थांबले नाही तर आपण जिल्हाधिकारी व महावितरण कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा माजी सभापती व पर्यावरण प्रेमी शौकत मुकादम यांनी दिला आहे.

सध्या आंब्याचा हंगाम सुरु होत असून, नुकताच शेतीची कामे देखील आटपली आहेत. शेती पंपाचा वापर पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जात असला तरी, महावितरणाकडून पाठवण्यात आलेली बिले हि अव्वाच्या सव्वा आहेत. त्यामुळे एक महिन्याच्या आत आंबा बागायतदार शेतकऱ्याच्या शेती पंपावरील विज बिलामध्ये महावितरणने बिले आकारणी कमी केली नाही, तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. पश्चिम महाराष्ट्र व विदर्भामध्ये बागायतदाराच्या बिलांमध्ये सवलत दिली जाते. मग कोकणावर अन्याय का,असा प्रश्न शौकत मुकादम यांनी उपस्थित केला.

कोकणामध्ये आंबा,काजू,फणस व इतर बागायतदारांची भरमसाट विजबिले येत आहेत. त्यामुळे कोकणातील बागायतदार हवालदिल झाले आहेत. कोकणामध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि आमच्या कोकणामध्ये महावितरण वीज बिलामध्ये सवलत देत नाही, अशी जर भरमसाठ बिले आकारली गेली तर कोकणामध्ये बागायत नसेल, तर पर्यटक कशाला,झोपा काढायला येणार का! आंबा बागायतदारांच्या कृषि पंपावर प्रंचड बिले आकारली जातात या विरुद्ध सरकार दरबारी चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी आवाज उठवला आहे. मोर्चामध्ये कोणतीही अनुसुचित प्रकार घडल्यास त्याला शासन जबाबदार राहील अशी माहिती माजी सभापती शौकत मुकादम यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular