जागतिक मत्स्यव्यवसाय दिनानिमित्ताने सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात येथे बंदिस्त खेकडा पालन संच हाताळणी आणि व्यवस्थापन या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम झाला. त्यावेळी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. प्रकाश शिनगारे बोलत होते.
प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता राज्यातील विविध जिल्ह्यातून विशेषतः मुंबई, नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पुणे, वसई व रत्नागिरी येथील प्रशिक्षणांर्थीनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तीन दिवसात खेकडा पालन, सद्यस्थिती व वाव, खेकड्यांच्या जातींची ओळख व जीवनचक्र, जिवंत खेकडा पालन संच व हाताळणी, पाण्याचे गुणधर्म आणि व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन, अर्थशास्त्र व प्रकल्प अहवाल कसा तयार करावा, खेकडा काढणी व काढणी पश्चात काळजी तसेच विक्री व्यवस्थापन या विषयावर तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
खेकडे संवर्धन अत्याधुनिक संच पद्धतीमध्ये खेकडे पालन हे कमी जागेत व कमी पाण्यात केले जात असल्यामुळे हा व्यवसाय सुरू करण्यास चांगली संधी आहे. बीज उपलब्धतेबाबतीत अडचणी लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच कोळंबी व खेकडा बीजोत्पादन केंद्र सुरू होणार, अशी घोषणा सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. प्रकाश शिनगारे यांनी केली.
तीन दिवसात खेकडा पालन, सद्यस्थिती व वाव, खेकड्यांच्या जातींची ओळख व जीवनचक्र, जिवंत खेकडा पालन संच व हाताळणी, पाण्याचे गुणधर्म आणि व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन, अर्थशास्त्र व प्रकल्प अहवाल कसा तयार करावा, खेकडा काढणी व काढणी पश्चात काळजी तसेच विक्री व्यवस्थापन या विषयावर तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्यक्ष या व्यवसायामध्ये काम करीत असलेले सातपाटी येथील आनंद तरे व उरण येथील जगदीश पाटील यांनी ऑनलाईन अनुभव कथन करून खेकडा संच प्रत्यक्ष कसे हाताळणी करावी याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. संशोधन केंद्राचे सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. सचिन साटम आणि अभिरक्षक डॉ. संतोष मेतर हे उपस्थित होते. केंद्राचे प्रा. डॉ. आसिफ पागरकर यांनी प्रास्ताविक, सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. नरेन्द्र चोगले यांनी सूत्रसंचालन केले.