26.8 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriमुख्यमंत्र्यांच्या प्रथम दौऱ्यात, ८०० कोटींच्या विकासकामांच्या शुभारंभ

मुख्यमंत्र्यांच्या प्रथम दौऱ्यात, ८०० कोटींच्या विकासकामांच्या शुभारंभ

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आयोजित केलेल्या रत्नागिरीतील या भव्य, विक्रमी सभेतून शक्तिप्रदर्शन होणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज रत्नागिरी येथे थ्रीडी अॅक्टिव्ह तारांगणाचा प्रारंभ होणार आहे. हे तारांगण राज्यातील पहिले थ्रीडी तारांगण आहे. ६५ आसनांची क्षमता असलेल्या या वातानुकूलित तारांगणात अनेक अत्याधुनिक सोयी पुरवण्यात आल्या आहेत. हे तारांगण खगोल प्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. १० कोटी रुपये खर्च करून हे तारांगण उभारण्यात आले असून, त्यामुळे कोकणच्या पर्यटनालादेखील एक प्रकारे चालना मिळणार आहे. याशिवाय अभियांत्रिकी महाविद्यालय, प्रादेशिक नळपाणी योजना, रत्नागिरी शहरासाठी काँक्रिटचे रस्ते यांसारख्या महत्त्वाच्या विकासकामांचे उद्‌घाटन आणि भूमिपूजनाचे नियोजन करण्यात आले आहे.

पदग्रहण केल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रत्नागिरी दौरा करत आहे. या दौऱ्यामध्ये जिल्ह्यातील ८०० कोटींच्या विकासकामांच्या आरंभ आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम होणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सभेला मंत्रिमंडळातील दिग्गज नऊ मंत्री उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे ठाकरे सेनेचे खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव यांनादेखील निमंत्रण देण्यात आलेले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आयोजित केलेल्या रत्नागिरीतील या भव्य, विक्रमी सभेतून शक्तिप्रदर्शन होणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यासाठी पालकमंत्र्यांनी अपार मेहनत देखील घेतली आहे.

याच बरोबर लांजा, राजापूर आदी तालुक्यांतील विकासकामांचाही यामध्ये समावेश होणार आहे. त्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता प्रमोद महाजन सभागृहामध्ये सभा संपन्न होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह या कार्यक्रमाप्रसंगी ठाकरे गटातील आमदारांनादेखील देण्यात आलेल्या निमंत्रणावरून, टोकाचे मतभेद व्यक्त असून देखील या दोन्ही गटाचे नेते एकत्र येतील का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याशिवाय सभेला मंत्रिमंडळातील दिग्गज नऊ मंत्री उपस्थित राहणार आहेत. कृषिमंत्री अब्दुल सत्तार, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे यांच्यासह अन्य मंत्र्यांचा यामध्ये समावेश आहे.

RELATED ARTICLES

Most Popular