25.1 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriतारांगणाच्या थ्रीडी आणि टुडी शोला उत्तम प्रतिसाद

तारांगणाच्या थ्रीडी आणि टुडी शोला उत्तम प्रतिसाद

येणाऱ्या पर्यटकांच्या मागणीवरून आयत्यावेळी शो दाखवता येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १६ डिसेंबरला पालिकेच्या मालकीच्या तारांगणाचे उद्घाटन झाले; परंतु पहिल्या शोला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने तो रद्द करावा लागला होता. आता पुन्हा तारंगणाचे थ्रीडी आणि टुडी शो सुरू झाले आहेत. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील हे एकमेव थ्रीडी तारंगण आहे. त्यामुळे त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दररोज सकाळी ११ आणि सायं. ४ चा शो निश्चित आहे. आज सकाळी ११ वा. झालेल्या थ्रीडी शोचा अनेक पर्यटकांनी आनंद घेतला. एक तासाच्या या शोला मोठ्या माणसांना १५० तर लहान मुलांना १०० रुपये शुल्क आहे तर टुडी शोला मोठ्या व्यक्तींना १०० तर लहान मुलांना ५० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे.

येथे तारांगणाच्या थ्रीडी आणि टुडी शोला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. यवतमाळ येथील पर्यटकांनी त्याचा आनंद घेतला. त्यामुळे दिवसाला सकाळी ११ आणि सायंकाळी ४ हे दोन शो नियमित होणार आहेत. येणाऱ्या पर्यटकांच्या मागणीवरून आयत्यावेळी शो दाखवता येणार आहे. आता कोणतीही तांत्रिक त्रुटी राहिली नसल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.

पर्यटकांच्या मागणीनुसार इतरवेळीही शो होणार आहे. आज यवतमाळ येथील पर्यटक आले होते. त्यासाठी दुपारी २ चा शो घेण्यात आला. तारांगणासाठी तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करायची आहे. तोवर संबंधित एजन्सीमार्फत शो घेतले जात आहे; परंतु आता किती व्यक्ती कमी आहेत म्हणून शो रद्द केला जाणार नाही. चार व्यक्तींसाठीही शो घेतला जाईल, असे पालिका प्रशासनाने सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular