27 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeSportsजगज्जेत्यानंतर 'शतकवीर' बनला लिओनेल मेस्सी रचला विक्रम

जगज्जेत्यानंतर ‘शतकवीर’ बनला लिओनेल मेस्सी रचला विक्रम

दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचे स्टार्स सध्या सातव्या आसमानावर आहेत. अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकून दिल्यानंतर त्याचा संघ सातत्याने सामने जिंकत आहे आणि लिओनेल मेस्सी एकापाठोपाठ एक विक्रम करत आहे. मंगळवारी मेस्सीने करेबियन संघ कुरासाओविरुद्ध हॉट्रेक केली. मेस्सीने आपल्या संघाला विश्वचषक चॅम्पियन बनवल्यानंतर सलग दुसरा विजय मिळवून दिला. या हॅट्ट्टिकसह लिओनेल मेस्सी शतकवीर ठरला.

मंगळवारी अर्जेंटिनाचा संघ करेबियन संघ कुरासाओविरुद्ध मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. या सामन्यात अर्जेंटिनाने आपल्या प्रतिस्पर्धी संघाला ७-० ने चिरडले. मेस्सी आपल्या देश अर्जेंटिनासाठी १७४ वा खेळण्यासाठी येथे आला आणि त्याने हा सामना आपल्यासाठी खूप खास बनवला.

मेस्सीने २० व्या मिनिटाला पहिला गोल केला. दोन बचावपटूंना चकमा देत त्याने साइड किकने गोल केला. या गोलसह त्याचे अर्जेंटिनासाठी गोलचे शतक पूर्ण झाले. अशी कामगिरी करणारा तो अर्जेंटिनाचा पहिला खेळाडू आहे. यानंतर त्याने ३३व्या आणि ३७व्या मिनिटाला गोल करत हॅट्रीक पूर्ण केली. अर्जेंटिनासाठी मेस्सीने हॅट्रीक करण्याची ही नववी वेळ ठरली. मेस्सीने आता १०२ आंतरराष्ट्रीय गोल केले असून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो या यादीत सर्वात वर आहे, ज्याने १२२ गोल केले आहेत. आणि इराणच्या अली देईने १०२ गोल केले आहेत. मेस्सी हा आपल्या देशासाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. त्याने १७४ सामन्यात १०२ गोल केले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular