27.2 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeChiplunदाभोळ खाडीत मासे मृत्युमुखी...

दाभोळ खाडीत मासे मृत्युमुखी…

तेथील पाण्यात ते मृत मासे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. दरम्यान, मासे नेमके कशामुळे मृत झाले, हा तपास सुरू आहे.

येथील दाभोळ खाडीत गेल्या काही महिन्यांपासून विविध प्रकारची मासळी मुबलक प्रमाणात मिळत होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून खाडीत मृत मासे पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. त्यामुळे खाडी परिसरातील मच्छीमार धास्तावले आहेत. या संदर्भात दाभोळखाडी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे संपर्क साधून माहिती दिली असता मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी नुकसानीचा पंचनामा करत मृत मासे आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. चिपळूणसह गुहागर, खेड, दापोली अशा चार तालुक्यांत सामावलेल्या या खाडीवर मासेमारी हेच तेथील मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन राहिले आहे.

सद्यःस्थितीत या खाडीत अनेक प्रकारची दर्जेदार मासळी खाडीत मिळत असल्याने मच्छीमारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे; मात्र असे असताना रविवारपासून खाडीत मृत मासे पाण्यावर तरंगताना ठिकठिकाणी दिसू लागले आहेत. या संदर्भात संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे माहिती दिली आहे. सोमवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी एस. डी. मोरे, क्षेत्र अधिकारी एस. एन. शिंदे, केतकी सरपंच महेंद्र भुवड, ग्रामसेविक प्रमिला सूर्यवंशी, तलाठी यु. आर. राजेशिर्के, संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय जुवळे, उपाध्यक्ष प्रभाकर सैतवडेकर, सचिव दिलीप दिवेकर, खजिनदार विजय जाधव, ज्येष्ठ सल्लागार शांताराम जाधव, केतकी ग्रामस्थ नितिन सैतवडेकर, उपसरपंच रमेश जाधव, राजाराम कासेकर आदींनी केतकी येथे जाऊन पंचनामा केला.

या पाहणीत ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार भिले, सोनगांव, कोतवली, गोवळकोट, धामणदेवी, मेटे, आयनी, शेरी, गांग्रई, बहिरवली, तुंबाड, शिरसी, शिव, मालदोली, होडखाड, पन्हाळजेसह खाडीलगतच्या गावात मृत मासे आढळले असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये रेणवी, कालाडू, पालू, बोय, तांबोशी, खरबा आदी प्रकारची मासळी मृत झाली आहे. याबाबत तेथील पाण्यात ते मृत मासे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. दरम्यान, मासे नेमके कशामुळे मृत झाले, हा तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular