25.2 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeKhedखेड शहरात दोन दिवसांपासून पाईपलाईन फुटल्यामुळे पाणी पुरवठा ठप्प

खेड शहरात दोन दिवसांपासून पाईपलाईन फुटल्यामुळे पाणी पुरवठा ठप्प

पाण्यासाठी शहरातील नागरिकांना दाहीदिशा फिरण्याची वेळ आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून खेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या भरणे जॅकवेल जवळील १२ इंची पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून खेड शहराला होणारा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. यामुळे नागरिकांचे पाण्यावाचून हाल झाले आहेत. पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. खेड नागरपलिकेकडून अवघ्या एक टँकरच्या भरवशावर प्रशासनाकडून शहरात पाणी वितरण सुरू आहे. भरणे जॅकवेल मधून खेड नगरपालिकेच्या पाणी साठवण टाकीत पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन जगबुडी पुलाखाली पाण्याच्या प्रेशरने फुटल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून खेड शहराला पाणी पुरवठा झाला नाही. पाण्याअभावी नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत.

पाण्यासाठी शहरातील नागरिकांना दाहीदिशा फिरण्याची वेळ आली आहे. पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून मंगळवारी २९ ऑगस्ट रोजी दिवसभरात ३ वेळा जोडणी केलेली पाईपलाईन पाण्याच्या प्रेशरने फुटली आहे. बुधवारी ३० ऑगस्ट रोजी सकाळपासून खेड नगरपालिकेच्या २० कर्मचाऱ्यांची तुकडी पाईपलाईन दुरुस्तीसाठी झटत होती. माजी उपनगराध्यक्ष कुंदन सातपुते, वैजेश सगवेकर, माजी नगरसेवक सतीश उर्फ पप्पू चिकणे, नगरपालिकेचे नागेश बोर्डले, उमेश रेपाळ, अरुण चव्हाण आदींनी मेहनत घेत पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. शहरातील पाणी पुरवठा ठप्प झाल्याने नगरपलिकेकडून अवघ्या एका टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा करण्यात येत होता. पाणी वितरणाचे नियोजन नसल्याने शहरातील ठराविक प्रभागातच हा पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

Most Popular