25.7 C
Ratnagiri
Tuesday, September 17, 2024
HomeRatnagiriरत्नदुर्ग किल्ल्यावर शिवसृष्टी उभारण्याच्या कामाला सुरुवात - ना. उदय सामंत

रत्नदुर्ग किल्ल्यावर शिवसृष्टी उभारण्याच्या कामाला सुरुवात – ना. उदय सामंत

शिवसृष्टीमध्ये २४ फूट उंच छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला जाणार आहे.

शहरातील रत्नदुर्ग किल्ल्यावर शिवसृष्टी उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा २४ फूट उंच पुतळा उभारला जाणार आहे. थिबापॅलेस येथे संभाजी महाराजांचा पुतळा, भाट्ये किनाऱ्याच्या विकासासाठी ५ कोटी, यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच त्यांनी या ठिकाणांची पाहणी देखील केली. पत्रकार परिषदेत श्री. सामंत म्हणाले, शहरातील रत्नदुर्ग किल्ल्यावर पर्यटनाच्यादृष्टीने विचार करुन शिवसृष्टी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याठिकाणी विविध किल्ल्यांच्या प्रतिकृतीसह छत्रपतींचा इतिहास नजरेखालून घालता येणार आहे.

या शिवसृष्टीमध्ये २४ फूट उंच छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला जाणार आहे. पर्यटनाच्यादृष्टीने ही शिवसृष्टी रत्नागिरीकरांचे गौरवाचे एक स्थान बनेल. पर्यटन वाढीसाठी शहराजवळील भाट्ये समुद्रकिनाऱ्याचा पर्यटन आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यासाठी ५ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भाट्ये समुद्रकिनारी पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. पर्यटकांना जास्तीतजास्त सुविधा देण्यावर भर दिला जाणार आहे.

भाट्ये प्रमाणेच मार्लेश्वर या धार्मिक स्थाळाचाही विकास केला जाणार आहे. त्यामुळे परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्यासाठी ५ कोटीचा आराखडा तयार केला जात आहे. संसारे गार्डन येथे ध्यान केंद्राची उभारणी केली जाणार आहे. तसेच शहरातील थिबापॅलेस येथेही छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. तर पर्यटनाचा विचार करुन शहरामध्ये भव्य अशी विठोबाची मूर्ती उभारण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी लवकरच जागा निश्चित केली जाणार आहे, असे सामंत यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular