26.5 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeChiplunचाकरमान्यांवर नवे संकट मध्यरात्री कशेडी घाटात बसेस ब्रेकडाऊन

चाकरमान्यांवर नवे संकट मध्यरात्री कशेडी घाटात बसेस ब्रेकडाऊन

त्यापाठोपाठ एक दोन न्हवे तर ठिकठिकाणी पाच एसटी बसेस ब्रेकडाऊन झाल्यामुळे, संपूर्ण घाटात चक्काजाम झाला.

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातून कोकणात आलेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास रविवारी सुरु झाला. कोकणात येते वेळी कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या कशेडी बोगद्यातून वाहतूक सुरु होती. त्यामुळे येते वेळी कसल्याही प्रकारच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले नाही. मात्र परतीचा प्रवास हा अवघड अशा कशेडी घाटातून होणार असल्याने रहदारी चांगलीच वाढली. कशेडी घाटातून जाणारी राज्य परिवहन महामंडळाची मुंबईकडे जाणारी गणपती स्पेशल जादा गाडी घाटातच ब्रेकडाऊन झाली.

त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. त्यापाठोपाठ एक दोन न्हवे तर ठिकठिकाणी पाच एसटी बसेस ब्रेकडाऊन झाल्यामुळे, संपूर्ण घाटात चक्काजाम झाला, कशेडी टॅब महामार्ग पोलिसांना अक्षरशः निर्माण झालेली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कसरत करावी लागली. अखेर सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या दरम्यान ब्रेकडाऊन झालेल्या एसटी बसेस पोलादपूर, महाड, खेड एसटी आगारातील मेकॅनिक यांना बोलावून ब्रेकडाऊन एसटी बसेस बाजूला करत एकेरी वाहतूक सुरु केली.

RELATED ARTICLES

Most Popular