27.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

रत्नदुर्ग किल्ल्यावरून थेट समुद्रात, तरूणीच्या मृत्यूचे गूढ

रत्नदुर्ग किल्ल्यावरून समुद्रात कोसळलेल्या तरूणीचे गूढ हळूहळू...

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...
HomeRatnagiriजयगड सरपंचांवरील अविश्वास ठराव फेटाळला

जयगड सरपंचांवरील अविश्वास ठराव फेटाळला

पालकमंत्री ना. सामंत यांनी या विषयात लक्ष घालून सदस्यांशी चर्चा केली.

तालुक्यातील जयगड ग्रामपंचायत सरपंच फरजाना डांगे यांच्याविरोधात आणलेला अविश्वास ठराव अखेर फेटाळला गेला. अविश्वास ठरावावर स्वाक्षरी करणारे दोन सदस्यच यावेळी अनुपस्थित राहिल्याने अविश्वास ठराव आणणाऱ्यांना चपराक बसली आहे. या विषयात पालकमंत्री उदय सामंत व बाबू पाटील यांनी किंगम करची भूमिका बजावत, सदस्यांचे मनपरिवर्तन करण्यात यश मिळवल्याने सौ. डांगे यांचा मार्ग सुकर झाला. जयगड ग्रामपंचायत ही तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीपैकी एक समजली जाते.

जिंदाल कंपनीसह अनेक व्यवसाय, जेटी या ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहेत. या ग्रामपंचायतीवर सध्या पालकमंत्री उदय सामंत यांच्या शिवसेना शिंदे गटाच्या सौ. फरजाना डांगे या सरपंच म्हणून कार्यरत आहेत. त्या कुणाला विचारात घेत नाहीत असा आरोप करीत त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली होती. या ग्रामपंचायतमध्ये नऊ सदस्य व थेट सरपंच अशी दहा संख्या आहे. यातील सात सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या तक्रारीवर सही केली होती. पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमोर हा विषय तालुकाध्यक्ष बाबू म्हाप, बाबू पाटील, विभागप्रमुख बाबय कल्याणकर, अजिम चिकटे, नारायण काताळकर, सलिम मिरकर यांनी आणला.

त्यानंतर पालकमंत्री ना. सामंत यांनी या विषयात लक्ष घालून सदस्यांशी चर्चा केली. अविश्वास ठरावासाठी शुक्रवार २९ सप्टेंबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. परिविधाधीन तहसीलदार गिड्डे यांनी सभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. या सभेला अविश्वास ठराव अर्जावर स्वाक्षरी करणाऱ्या देवयानी खाडे, देवयानी मयेकर, अमेय परकर, विशाल झगडे व दर्शना चव्हाण हे सात पैकी पाच सदस्य उपस्थित होते. त्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजून मतदान केले.

परंतु अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी आठ मतांची आवश्यकता होती. ते पूर्ण न झाल्याने अविश्वास ठराव फेटाळला गेला. तक्रार अर्जावर सही करणारे दोन सदस्य अनुपस्थित राहिलें. सरपंच सौ. फरजाना डांगे यांच्या विरोधात असणाऱ्यांना त्यामुळे चपराक बसली आहे. सरपंच डांगे यांचा अविश्वास ठराव फेटाळला गेल्याने त्यांचे नासीर संसारे, अनिस अडूळकर, मुफ्ती साबीर डांगे, सलीम संसारे, हिदायत होडेकर यांनी अभिनंदन केले

RELATED ARTICLES

Most Popular