22.7 C
Ratnagiri
Tuesday, December 9, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeChiplunचिपळुणातील मोठ्या उड्डाणपुलाच्या कामाचा वेग वाढविण्याची मागणी

चिपळुणातील मोठ्या उड्डाणपुलाच्या कामाचा वेग वाढविण्याची मागणी

पुलांसाठी एकूण ४६ खांब उभारल्यानंतर तत्काळ त्यावर गर्डर चढविण्याचे काम सुरू केले आहे.

मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत चिपळुणात उभारण्यात येणाऱ्या कोकणातील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाच्या कामाचा वेग आणखी वाढला आहे. या पुलासाठी तब्बल ४६ पिलर उभारल्यानंतर हे काम आता बहाद्दूरशेख नाक्यातील अवघड टप्प्यावर आले आहे. चौकातील काम ओलांडल्यावर या कामाला आणखी गती येणार आहे. पावसाळ्यापूर्वी चौपदरीकरणातील किमान एकेरी वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र, तितकेसे यश आले नाही. अजूनही एकेरी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. आता खेड हद्दीत कल्याण टोलवेज व चिपळूण हद्दीत इगल कन्स्ट्रक्शनची मोठी यंत्रणा काम करीत आहे. इंगल कन्स्ट्रक्शन कंपनीने चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयादरम्यानच्या उड्डाणपुलावरही अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

शहरातून जाणारा १.८५ किलोमीटर अंतराचा हा उड्डाणपूल उभारताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या पुलांसाठी एकूण ४६ खांब उभारल्यानंतर तत्काळ त्यावर गर्डर चढविण्याचे काम सुरू केले आहे. वाशिष्ठी पुलापासून बहादूरशेख नाकादरम्यानचे गर्डरचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता अतिशय अवघड टप्प्यात काम सुरू केले आहे त्याशिवाय दोन्ही बाजूंनी साडेपाच मीटरचा सर्व्हिस रस्ता असून त्याचेही. काम अद्याप अपूर्ण आहे. परशुराम ते आरवलीदरम्यानच्या कामाचा वेग वाढला असून हेही काम अंतिम टप्प्यात आहे. काही ठिकाणी मोऱ्या व गटारे उभारणे अशी कामे सुरू आहेत. सुमारे ३६ किलोमीटरच्या अंतरातील हे काम टप्प्याटप्प्याने केले जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular