23.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeChiplunचिपळूणमध्ये कोसळलेल्या गर्डरची तज्ज्ञ अभियंत्यांकडून पाहणी

चिपळूणमध्ये कोसळलेल्या गर्डरची तज्ज्ञ अभियंत्यांकडून पाहणी

तज्ज्ञ अभियंता व्ही. एन. हेगडे आणि विनय गुप्ता हे चिपळुणात दाखल झाले होते.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बहादूरशेख येथील नव्याने उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे गर्डर कोसळले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आलेल्या समितीने बहादूरशेख येथे जाऊन कोसळलेल्या पुलाची पाहणी केली, तर गुरुवारी दिवसभर त्यांनी कोंडमळा येथे ईगल कंपनीच्या कास्टिंग प्लॅन्टला भेट दिली. तेथे गर्डर तयार करण्याच्या प्रक्रियेची पाहणी केली. बुधवारी (ता. २५) सायंकाळी तज्ज्ञ अभियंता व्ही. एन. हेगडे आणि विनय गुप्ता हे चिपळुणात दाखल झाले होते. उड्डाणपूल कोसळल्यानंतर शासनाने समितीची नियुक्ती केली. ही समिती चिपळूण येथे दाखल झाली असून, त्यांनी उड्डाणपूल व त्या संबंधीची पाहणी सुरू केली आहे.

या समितीच्या अधिकाऱ्यांनी कामथे येथील ईगल कंपनीच्या कार्यालयात जाऊनदेखील या पुलाचा आराखडा, अंदाजपत्रक व अन्य तांत्रिक माहिती घेतली. गर्डर कास्टिंग कसे केले जाते, याची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. याशिवाय प्रत्येक टीमशी या द्विसदस्यीय समितीने चर्चा केली. कास्टिंग करणारे कर्मचारी, गर्डर लॉन्चिंग करणारे कर्मचारी, सुपरव्हिजन करणारी कंपनी, ईगलचे अधिकारी व कर्मचारी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी यांच्याबरोबर सविस्तर चर्चाच्या फेऱ्या दिवसभर करण्यात आल्या. उड्डाणपुलाच्या बांधकामाची सविस्तर माहिती या तज्ज्ञ समितीने घेतली आहे. समितीच्या अहवालानंतरच पूल पडण्याची कारणे समोर येणार आहेत. ही समिती कोसळलेला गर्डरचा भाग कशा पद्धतीने काढायचा, याबाबत मार्गदर्शन करणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular