26.1 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriयावर्षीचा आंबा हंगाम दोन टप्प्यांत, सध्या २५ टक्के मोहोर

यावर्षीचा आंबा हंगाम दोन टप्प्यांत, सध्या २५ टक्के मोहोर

वातावरण अनुकूल राहिल्यास मार्च ते एप्रिलमध्ये सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील फळधारणा मे अखेरीस मिळेल.

दिवाळीच्या पूर्वसत्रात झालेल्या पावसामुळे आंब्याच्या येणाऱ्या हंगामात बागायतदारांना दोन टप्प्यांत उत्पादन मिळेल, अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. दिवाळीच्या आधी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे आंब्याचा हंगाम डिसेंबर ते मार्च आणि मार्च ते मे अशा दोन्ही टप्प्यात येईल, अशी शक्यता आहे. आंब्याची बेगमी दिवाळी झाल्यानंतर गुलाबी थंडीच्या चाहुलीने सुरू होते. यंदा दिवाळीआधीच रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. हलका गारठा पडत असताना पडलेल्या पावसाने कलमांना नवीन फुटवे धरण्याची प्रक्रिया बागांमध्ये सुरू झाली. त्यामुळे मोहोर प्रक्रियाही वेगाने होईल. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील उत्पादन लवकर येण्याची शक्यता बागायतदारांनी व्यक्त केली आहे.

पहिल्या टप्प्यातील उत्पादन मार्च अखेर मिळण्याची शक्यता या पावसाने वाढवली आहे. त्यानंतर वातावरण अनुकूल राहिल्यास मार्च ते एप्रिलमध्ये सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील फळधारणा मे अखेरीस मिळेल. दोन्ही टप्प्यांतील उत्पादन घेण्यासाठी सध्या तरी वातावरण अनुकूल आहे. ७ नोव्हेंबरला रत्नागिरीत जोरदार पाऊस झाला. त्यानंतर हलक्या पावसाचे सातत्य असताना काही १० ला पाऊस झाला. त्यामध्ये जोर नव्हता ही बाब सध्यातरी बागायतदारांच्या पथ्थ्यावर पडणार आहे. दक्षिण कोकणात पडलेला पाऊस मात्र जोरदार असल्याने त्याचा सौम्य फटका हापूसला बसणार आहे.

पुढील वातावरण उबदार झाल्यास या बागाही दोन टप्प्यांत मोहोरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मागील वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता; मात्र, गारठा पडायला लागल्यानंतर झालेल्या या पावसाने आंब्यावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला होता. काही भगात थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाल्याने फळ काळवंडले. त्यामुळे नुकसान झाले होते; मात्र, अद्याप थंडीचा जोर वाढला नसल्याने यंदाची वातावरणीय स्थिती अनुकूल असल्याचे बागायतदारांचे मत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular