23.5 C
Ratnagiri
Wednesday, February 5, 2025

ना. नितेश राणे आता भाजपचे रत्नागिरी जिल्हा संपर्कमंत्री

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री...

पुन्हा केवायसीचा कार्डधारकांमागे ससेमिरा, शिधापत्रिकाधारकांतून नाराजी

रेशनकार्ड आधार ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना शासनाकडून...

पालू लघुपाटबंधारे योजनेला मंजुरी, किरण सामंत यांचा पुढाकार

उन्हाळ्यामध्ये टंचाईग्रस्त भागात पहिला टँकर सुरू कराव्या...
HomeRatnagiriपोलिस गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू

पोलिस गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू

सव्वाशे कोटीहून अधिक रक्कम या निवासस्थानांसाठी मंजूर झाली आहे.

जिल्हा पोलिस मुख्यालय परिसरात गेले अनेक वर्षे मोडकळीस आलेल्या घरात राहणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना हक्काचे चांगले घर मिळणार आहे. त्यासाठी सुमारे सव्वाशे कोटींहून अधिक रक्कम मंजूर झाली असून प्रकल्पाच्या कामाला सुरवात झाली आहे. यामध्ये १२ मजल्याच्या ३ मोठ्या इमारतींचा समावेश आहे. जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांची गृह विभाग काळजी घेत असल्याचे स्पष्ट होत आहे. पोलिस गृहनिर्माण प्रकल्पाचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता. सुरवातीला म्हाडाचे तत्कालीन अध्यक्ष उदय सामंत यांनी त्यासाठी प्रयत्न केला होता; परंतु जागा हस्तांतरणावरून हा विषय मागे पडला.

आता उद्योगमंत्री म्हणून त्यांनी पोलिस गृहनिर्माण प्रकल्पाचा पाठपुरावा करून त्यासाठी सव्वाशे कोटी रुपये मंजूर करून आणले. जिल्हा पोलिस मुख्यालय आणि त्या परिसरात असणाऱ्या पोलिस गृहनिर्माण प्रकल्पाच्या कामाला सुरवात झाली आहे. त्यामध्ये १२ मजल्याच्या ३ इमारती उभारल्या जाणार आहेत. पोलिस अधिकाऱ्यांसाठी एकूण ६, पोलिस अंमलदारांसाठी २१६ निवासस्थाने प्रस्तावित करण्यात आली आहेत. प्रत्येक ७२ निवासाच्या १२ मजल्याच्या ३ इमारती त्या ठिकाणी बांधल्या जाणार आहेत. त्यामुळे सव्वाशे कोटीहून अधिक रक्कम या निवासस्थानांसाठी मंजूर झाली आहे.

लोकांच्या सुरक्षेसाठी नेहमी धावणाऱ्या पोलिसांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षितता महत्वाची असून महाराष्ट्राचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे या सर्व इमारती पूर्णत्वास जाणार आहेत. कामाला सुरवात झाली आहे. जुन्या झालेल्या चाळी पाडल्या जात आहेत. या चाळींच्या जागेवर या ३ मोठ्या इमारती उभारल्या जाणार आहेत. दोन वर्षांची या कामाला मुदत आहे. त्यामुळे २०२७ ला पोलिस अधिकारी आणि कर्मचारी नवीन हक्कांच्या घरामध्ये जातील अशी अपेक्षा आहे. लवकरच या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

Most Popular