26.8 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriतलवार घेवून दुकानात घुसून दादागिरी करणाऱ्याला अटक

तलवार घेवून दुकानात घुसून दादागिरी करणाऱ्याला अटक

मुबीन जैनुद्दीन मिरकर या दुकानदाराने रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली आहे.

उधारीचे पैसे आधी दे त्यानंतर पुन्हा कपडे देईन असे व्यवसायिकाने सांगताच रागाच्याभरात तलवार घेवून दुकानात घुसंत दुकानाच्या काचा फोडणाऱ्या आणि दुकान चालकाला मारहाण केल्याच्या आरोपाखाली एका तरुणाला रत्नागिरी शहर पोलिसांनी अटक केली आहे. नागेश प्रकाश गजबार (वय २८, रा. कुवारबांव, रत्नागिरी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव असून न्यायालयासमोर त्याला उभे केले असता २ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली.

या विषयी अधिक वृत्त असे की, याविषयी मुबीन जैनुद्दीन मिरकर या दुकानदाराने रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीत असे नमूद करण्यात आले की, मिरकर यांच्या दुकानात आरोपी नागेश काही दिवसांपूर्वी आला होता आणि उधारीवर कपडे घेवून गेला होता. बुधवारी (२० डिसेंबर) दुपारी १ वाजता तो पुन्हा दुकानात आला आणि कपडे मागू लागला. त्यावेळी आधीच्या कपड्यांचे पैसे दे, मग तुला पुन्हा कपडे मिळतील असे मिरकर यांनी त्याला सांगितले. त्यानंतर तो रागावून निघून गेला अशी माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली.

तलवार घेवून घुसला – दुपारी रागाच्याभरात निघून गेल्यानंतर त्याचा राग काही शांत झाला नाही. त्यामुळे बुधवारी सायंकाळी ६.४५ वा. आरोपी गजबार पुन्हा एकदा दुकानात घुसला. तेव्हा त्याच्या हातात तलवार होती. दादागिरी करत त्याने दुकानमालक मुबीन मिरकर यांना शिवीगाळ केली. मारहाण करत दुकानाची काच फोडली असे मिरकर यांनी नोंदविलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मिरकर यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ संशयित आरोपी नागेश प्रकाश गजबार या तरुणाविषयी भा.द.वि.क. ३२३, ५०६, भारतीय हत्यार कायदा क्र.४, १२५ सह ३७ (१), १३५ अन्वये तसेच जबरदस्तीने दुकानात प्रवेश केल्याच्या आरोपाखाली भा.द.वि.क. ४५२ अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. गुरुवारी संशयित आरोपी नागेशला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची रवानगी २ दिवसांसाठी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular