26.4 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriसलग पाचव्या वर्षी “दिपस्तंभ पुरस्कार” जाहीर

सलग पाचव्या वर्षी “दिपस्तंभ पुरस्कार” जाहीर

रत्नागिरीमधील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला सन २०१९-२० साठीचा महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचा “दिपस्तंभ पुरस्कार” घोषित करण्यात आला आहे. सतत ५ वर्ष हा पुरस्कार या पतसंस्थेला प्राप्त झाला आहे. १०० कोटींच्या पेक्षा अधिक ठेवी असलेल्या संख्या गटात प्रथम क्रमांकाने संस्थेला गौरवण्यात आले आहे.

स्वरूपानंद पतसंस्थेने महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीत दिपस्तंभाप्रमाणे कार्य करून पतसंस्था चळवळीला चांगली दिशा दर्शवली आहे. ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार संस्थेच्या पत्रामध्ये, अनेक वर्षे केलेल्या या दिशादर्शक आणि उल्लेखनीय कार्याबद्दल हा दिपस्तंभ पुरस्कार स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला प्रदान करत असल्याचे नमूद केले आहे. स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने आर्थिक शिस्त व विश्वासहार्यता जपत सातत्याने आपले आर्थिक साठवणूक वाढवत नेली आहे.

त्याचप्रमाणे विविध नवनवीन संकल्पना आणि उपक्रम राबवत पतसंस्थेला जनसामान्याच्या जवळ ठेवले आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर, कार्यविस्तार, व्यावसायिक दृष्टिकोन, उत्तम आर्थिक स्थिती, निकषांची परिपूर्ती आणि सहकार तत्व याच संतुलन आणि समाजभान ठेवत केलेले व्यवहार ही पतसंस्थेची शक्ती स्थान राहिली आहे.

सलग ५ व्या वर्षी स्वरूपानंद पतसंस्था या दीपस्तंभ पुरस्काराची मानकरी ठरत आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया स्वरूपानंदचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली. दिनांक २४ जुलै रोजी शिर्डी येथील समारंभामध्ये राज्याचे सहकार मंत्री महोदय ना. पाटील यांचे हस्ते या दीपस्तंभ पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे जनतेच्या विश्वासासाठी पात्र ठरल्याने, ठेवींचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढत आहे. मागील काही महिन्यांमध्ये कोट्यावधींच्या ठेवींची गुंतवणूक करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular