27.1 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriम्हशी देण्याच्या आमिषाने अडीच लाखांची फसवणूक

म्हशी देण्याच्या आमिषाने अडीच लाखांची फसवणूक

मुरा जातीच्या म्हशींची व्यवसायाकरिता गरज होती.

दूध व्यवसायासाठी गुजरात येथून म्हशी देतो असे आमिष दाखवून २ लाख ६३ हजारांची फसवणुकीचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिस आदमभाई घांची ऊर्फ आबू व अमितभाई आदमभाई घांची (दोघेही रा. धराद, गुजरात) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना २८ ते २९ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसातच्या सुमारास वेतोशी येथे घडली. जगदीश कृष्णा झोरे (वय २९, रा. वेतोशी, धनगरवाडी, रत्नागिरी) हे दुध व्यावसायिक असून ते वेतोशी येथे म्हशी पाळून दुध विक्री करतात. त्यांना मुरा जातीच्या म्हशींची व्यवसायाकरिता गरज होती.

त्यामुळे त्यांचा मित्राने गुजरात राज्यातून मुरा जातीच्या म्हशी खरेदी केलेल्या असल्याने त्यांचे व फिर्यादी यांचे ओळखीचे संशयित आबु व अमित भाई यांच्याशी त्यांनी मोबाईलवरुन संपर्क करुन दिला. त्याना मुरा जातीच्या म्हशी पाहिजेत असे कळविले. त्यांनी म्हशीचे फोटो व व्हिडिओ पाठविल्यानंतर जगदीश झोरे यांनी त्यापैकी सहा म्हशी पसंत करुन म्हशींची किंमत ठरवून संशयित अमितभाई यांना ऑनलाईन ९८ हजार रुपये पाठविले. त्यानंतर १ लाख ६५ हजार बँकेतून असे एकूण २ लाख ६३ हजार रुपये संशयितांना पाठविले. संशयितांनी म्हशी दोन दिवसात पाठवतो असे सांगून फसवणूक केली. या प्रकरणी जगदीश झोरे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular