राज्यात कोरोना काळामध्ये विविध व्यवसायांवर निर्बंध लादण्यात आले होते. सध्या अनेक जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा म्हणून काही निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसियांकाच्या इंडियन हॉटेल अँण्ड रेस्टॉरंट्ंस असोसिएशन आहार तसेच हॉटेल ओनर्स असोसिएशन, एनआरएई या संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्ट मंडळासमवेत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.
अजूनही कोरोनाची गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेऊन, त्याबाबतच्या परिणामांचा विचार करून, त्यानंतरच हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. निर्बंध शिथिल करताना, आपल्याला कोरोनाची तिसरी लाट टाळायची आहे याचे ध्यान ठेवणे गरजेचे आहे आणि त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियम कठोरपणे पाळणे अत्यावश्यक आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
राज्यातले हॅाटेल्स-रेस्टॉरन्ट मालक लॅाकडाऊनच्या सध्याच्या निर्बंधावर नाराज असल्याचे समोर आले असून, योग्य न्याय मिळण्याची वाट पाहत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र सध्याच्या निर्बंधाबद्दल एकदम ठाम असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हॅाटेल मालकांना ठणकावलं आहे कि, मला लोकांचा जीव महत्वाचा आहे. आठवड्याभरामध्ये भागांप्रमाणे परिस्थिती पाहुन निर्णय देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी हॅाटेल मालकांना दिलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्याला सर्व गोष्टी पूर्ववत, सुरळीत आणि नेहमीप्रमाणे सुरु करायच्या असल्याने, काही काळ कोरोनाच्या स्थितीनुसार, नियम पाळावेच लागणार आहेत. पहिल्या लाटेमध्ये बऱ्याच प्रमाणात जीवितहानी झाली असून, दुसर्या लाटेच्या काळामध्ये लस उपलब्ध झाल्याने, काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. परंतु, अनेक ठिकाणचे असलेले कडक निर्बंधांमुळे हॉटेल व्यावसायिक हतबल झाले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर त्यावर योग्य तोडगा काढण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे.