28.8 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

७२ तासानंतर महिलेचा मृतदेह सापडला, चर्चाना फुटलंय पेव

तब्बल ७२ तासांच्या प्रयत्नानंतर अखेर अश्विनी अहिरेचा...

तटरक्षक दलाचा टिळक रुग्णालयाबरोबर करार

भारतीय तटरक्षक दल हे संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित...

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...
HomeMaharashtraमुख्यमंत्र्यांनी निर्बंधात दिली सवलत

मुख्यमंत्र्यांनी निर्बंधात दिली सवलत

राज्यातील कोरोनाची लाट ओसरत चालली असून, त्यामुळे येत्या १५ ऑगस्टपासून कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासास मान्यता दिली असून याची होणार अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची घोषणा रविवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

कोरोना काळामध्ये मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेन बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे, उपनगरीय सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वेमधून प्रवास करण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. मुख्यमंत्री पुढे सांगतात की,  अनेक प्रवासी संघटना तसेच नागरिकांनी वारंवार लोकल सेवा वापरण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. परंतु, आपणा सर्वाना माहीत आहे कि, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून आपण पूर्णपणे सावरलेलो नाही. तसेच संभाव्य तिसऱ्या लाट उदभवण्याचा धोका देखील अजून आहे. केंद्र सरकारने देखील वारंवार इशारा दिला असून, तरीदेखील अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देण्यात येत आहे.

ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन १४  दिवस पूर्ण झाले असतील, त्यांना १५  ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करण्याची सवलत दिली गेली आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत, असे प्रवासी मोबाईल एपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करून प्रवास करू शकतात आणि ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही असे प्रवासी उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून किंवा शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालयामधून फोटो पास घेऊ शकतात. आणि  रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळून पाहता येण्यासाठी, लोकल प्रवासाच्या या पासवर क्यूआर कोड देण्यात आला आहे. त्यामुळे कुणीही बेकायदेशीररित्या पास प्राप्त करून प्रवास करण्यावर वचक राहील. त्यामुळे ज्यांना लोकलने प्रवास करायचा आहे त्यांनी, लसींचे दोन डोसेस घ्यावेत आणि प्रवास करावा, असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular