26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeSportsभारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहलीवर टीका

भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहलीवर टीका

जगभरामध्ये क्रिकेटची चर्चा सर्वत्रच सुरु असते. त्याचप्रमाणे विविध देशातील क्रिकेट खेळाडूंची देखील कोणत्या ना कोणत्या प्रसंगी जरूर आठवण काढली जाते, मग तो चांगला क्षण असो किंवा वाईट. पण खेळाच्या नियमाप्रमाणे खेळ हा फक्त खेळासारखा खेळला गेला पाहिजे, ना त्यात कोणत द्वंद्व असावे ना कोणता द्वेष. पण काही खेळाडू मात्र असे प्रसंग कायम लक्षात ठेवतात.

भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या मैदानावरील आक्रमक वर्तनाबाबत इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू निक कॉम्प्टनने टीका केली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटी दरम्यान, खेळाडू मैदानावर आमनेसामने लढताना दिसले. जसप्रीत बुमराह आणि जेम्स अँडरसन या दोघांमध्ये बाऊन्सरवरून वाद उत्पन्न झाला. कोहली त्याच्या रोख ठोक भूमिकेबद्दल कायमच चर्चेत असतो. तो विरोधी खेळाडूंना त्यांच्या स्वरामध्ये उत्तर देण्यात मागे पुढे बघत नाही.

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू निक कॉम्प्टनच्या मते, भारताचा कर्णधार हा सर्वात वाईट बोलणारा व्यक्ती आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटी हा असाच एक प्रसंग होता जिथे कोहलीची अँडरसन, बटलर इत्यादींसह अनेक शाब्दिक चकमक झालेली. मात्र, नंतर भारतीय कर्णधाराने अँडरसनशीही हस्तांदोलन करून वाद मैदानातच मिटविला.

पण कॉम्प्टनने म्हटले की, “कोहली सर्वात घाणेरडे तोंडाचा व्यक्ती आहे का?  २०१२ साली विराटकडून मला मिळालेले गैरवर्तन मी कधीच विसरु शकत नाही, त्यामुळे खेळाच्या आधी मैदानामध्ये शपथ घेताना मला आश्चर्य वाटले की, त्याने स्वतःच एक गंभीर गैरव्यवहार केला आहे. कॉम्प्टनने कोहलीची तुलना सचिन तेंडुलकर, केन विल्यमसन आणि जो रूट सारख्या खेळाडूंशी केली असल्याने,  रूट, तेंडुलकर, विल्यमसन अतिशय सभ्यवर्तनी आहे यावर त्याचा विश्वास आहे.

RELATED ARTICLES

Most Popular