25.9 C
Ratnagiri
Saturday, September 21, 2024

सिद्धांत चतुर्वेदीने ॲक्शनने जिंकली मनं, ‘युध्रा’ची कथा

सिद्धांत चतुर्वेदी यांचा न पाहिलेला अवतार असलेला...

अश्विनचे शतक सहा बाद १४४ नंतर भारताची मजल ३३९ पर्यंत

रोहित शर्मा आणि विराट कोहली प्रत्येकी ६...
HomeRatnagiriरत्नागिरीचे मनोरुग्णालय पश्चिम महाराष्ट्रात? स्थलांतरासाठी चार वर्षे लागणार

रत्नागिरीचे मनोरुग्णालय पश्चिम महाराष्ट्रात? स्थलांतरासाठी चार वर्षे लागणार

रत्नागिरी व सिंधुदुर्गातील रुग्णांना पश्चिम महाराष्ट्रात जावे लागण्याची शक्यता आहे.

इंग्रजांच्या काळापासून रत्नागिरीत सुरू असलेले प्रादेशिक मनोरुग्णालय कोल्हापुरातील जयसिंगपूर उदगाव येथे सुरू करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. आकृतिबंधानुसार मंजूर असलेली पदे उदगाव येधील ३६५ खाटांच्या प्रादेशिक मनोग्णालयासाठी वर्ग करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे रत्नागिरीतील मनोरुग्णालय बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या या ठिकाणी १३० रुग्ण कार्यरत असून, अधिकारी, कर्मचाऱ्यांची ५० टक्के पदे रिक्त आहेत. रत्नागिरीतील प्रादेशिक मनोग्णालय रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांसाठी आहे. रुग्णालयास सुमारे ३६५ खाटांची मंजुरी आहे.

सध्या १५० हून अधिक रुग्णांचा भार सांभाळण्याची जबाबदारी पेलावी लागते. या रुग्णालयात एकूण १४४ मंजूर पदे आहेत. त्यापैकी ५० टक्के पदे रिक्त आहेत. त्यात वर्ग १ आणि चतुर्थश्रेणी, ब गट, क गट अशा पदांचा समावेश आहे. रुग्णांची संख्या अधिक असल्याने या रुग्णांची देखभाल करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यालयीन पदे रिक्त आहेत. रुग्णांच्या सुरक्षेच्यादृष्टीने रुग्णालय प्रशासनाला कमी कर्मचाऱ्यांमध्येच सध्या लक्ष ठेवावे लागत आहे. त्यामुळे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर मोठा ताण येत आहे.

कोल्हापूर, सांगली व सातारा आणि सीमाभागातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना मनोरुग्णालयात पुणे किंवा रत्नागिरी येथे जावे लागते. त्यामुळे गेली अनेक वर्षे कोल्हापूरमध्ये मनोरुग्णालय व्हावे यासाठी प्रयत्न सुरू होते. पश्चिम महाराष्ट्रातील रुग्ण व नातेवाइकांची अनेक वर्षांपासूनची मागणी लक्षात घेत कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे रत्नागिरीच्या धर्तीवर ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोग्णालय स्थापन करण्याबाबतच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाची मान्यता आहे. दीडशे वर्षांपूर्वीच्या या मनोरुग्णालयाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत असल्यामुळे मनोरुग्णालय बंद झाल्यास आता रत्नागिरी व सिंधुदुर्गातील रुग्णांना पश्चिम महाराष्ट्रात जावे लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मनोरुग्णालयात दरदिवशी १०० ते १६० रुग्णांची तपासणी केली जाते. आतापर्यंत १९१ रुग्ण बरे झाले असून त्यांना पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले आहे. सध्या १३० रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत. या ठिकाणी ६० टक्के रुग्ण हे पश्चिम महाराष्ट्रातून उपचारासाठी येतात तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी २० टक्के रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णालय पश्चिम महाराष्ट्रात स्थलांतरित झाले, तर कोकणातील रुग्णांना उपचारासाठी तिकडे जावे लागेल.

RELATED ARTICLES

Most Popular