रत्नागिरीतील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिरात श्री देवी तुळजाभवानी देवस्थानात विजयादशमी निमित्त राजेशाही दसरा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. ७ पुरोहितांनी मंत्रोपच्चारात यजमानांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. शमीच्या पूजनानंतर अश्वपूजन करून सोने लुटण्याचा कार्यक्रम राजेशाही रिवाजानुसार श्रीराम मंदिराच्या प्रांगणात पार पडला. यावेळी अनेक मान्यवर आणि रत्नागिरीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थितः होते. सालाबादप्रमाणे यावर्षी देखील रत्नागिरीतील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिरात श्री देवी तुळजाभवानी देवस्थानात नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले. आज विजयादशमीला राजेशाही दसरा थाटामाटात संपन्न झाला. विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी जैनमुनीवर उपस्थित होते. अश्वासह जैनमुनिंना वाजतगाजत मंदिरात आणण्यांत आले आणि त्यानंतर राजेशाही दसऱ्याच्या विधीला सुरूवात झाली.
मान्यवरांचे स्वागत – या कार्यक्रमासाठी येणाऱ्या मान्यवरांसह भाविकांचे स्वागत श्रीराम मंदिर ट्रस्ट व श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. उर्मिलाताई घोसाळकर यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व त्यांनी शाही दसऱ्याच्या विधीला सुरूवात झाली.
यजमानांच्या हस्ते पूजन – राजेशाही दसऱ्यानिमित्त शस्त्रपूजन, शमीपूजन पारं पडलेः यासाठी रत्नागिरीतील नामवंत मंडळी सपत्नीक पूजनाला बसले होते. दै. रत्नागिरी टाइम्सचे संचालक, युवा उद्योजक विराज घोसाळकर, सौ. राजवर्धिनी विराज घोसाळकर यांच्यासह माजी आमदार बाळ माने, सौ. माधवी माने, माजी नगरसेवकराजन शेट्ये, सौ. राजेश्वरी शेट्ये, केशवराव इंदुलकर, जितेंद्र उर्फ जितूशेठ शेट्ये यांच्यासह अन्य यजमान सपत्नीक पुजेसाठी बसले होते.
मंत्रोपच्चारात पूजन – राजेशाही दसऱ्यासाठी रत्नागिरीतील ख्यातनाम पुरोहितांना निमंत्रित करण्यात आले होते. या पुरोहितांनी मंत्रोपच्चारात यजमानांच्या हस्ते पूजन करून घेतले. त्यानंतर अश्वपूजन करण्यात आले. सजवलेल्या अश्वाची विधीवत पूजाअर्चा करून अश्वपूजनदेखील थाटामाटात पार पडले.
मुनीवरांचा सन्मान – या कार्यक्रमाची शोभा वाढवली ती जैन मुनी प.पू. श्री. प्रभूप्रेमशेखरविजयजी व प.पू. श्री. योगदृष्टीशेखरविजयजी यांनी. म नीश्वरांचे मंदिरात आगमन झाल्यानंतर आधी त्यांनी प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन घेतले. त्यानंतर मुनिश्वर शाही दसऱ्याच्या पूजनाठिकाणी आसनस्थ झाले. यावेळी दै. रत्नागिरी टाइम्सचे संपादक श्री. उल्हासराव घोसाळकर, श्री. केशवराव इंदुलकर, श्री. सुधाकरराव सावंत, श्री. राकेश चव्हाण, श्री. दीपक राऊत, श्री. विनायक हातखंबकर, प्रा. प्रतापराव सावंतदेसाई आदींच्या हस्ते एकत्रित या मुनिवरांचा सन्मान करण्यात आला.
प्रभूभक्त कसे आहात ? – यावेळी जैनी मुनींनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जीवनाचे सार नेमकं कशात आहे हे थोडक्या शब्दात सांगितले. त्यांनी सुरूवातीलाच प्रभूभक्त आपण कसे आहात… असे विचारले. तुम्हाला सद्गती हवी आहे का, तुम्ही सुखी आहात का, जगी सर्व सुखी असा कोण आहे, प्रत्येक घरात रामायण नाही पण महाभारत पहायला मिळते. तुम्हाला स्वर्ग पाहिजे, नरक पाहिजे, सद्गती पाहिजे तर ते तुमच्याच हातात आहे. मी तुला सुखी करू शकत नाही, सद्गती देऊ या ‘राजेशाही दसरा’ सोहळ्यासाठी जैन मुनी प.पू. श्री. प्रभू प्रेमशेखर विजयजी वं प.पू. श्री. योगदृष्टी शेखरविजयजी आपुलकीने उपस्थित होते. त्यांचे वाजत गाजत मिरवणूकीने आगमन झाले. या जैन मुनीवर्यांनी आशीर्वादपर प्रवचन केले. त्यावेळी सारे उपस्थित तल्लीन झाले. या दोघा मुनीवर्यांचा श्रीराम मंदिर देवस्थान व मंगलमूर्ती प्रतिष्ठानतर्फे भावपूर्ण सत्कार करण्यात आला. शकत नाही, आपले प्रभू हे मार्गदर्शक आहेत. कर्माधिन आहे पुत्र मानवाचा अशी पंक्ती उच्चारत त्यांनी सांगितले की, जीवनाचे सार हे आपल्या कर्मावर अवलंबून आहे.
संस्कृती संपवू शकणार नाहीत – यावेळी दुसरे जैनमुनी यांनी डोळ्यात अंजन पडेल असे मार्गदर्शन करताना सांगितले की, जोपर्यंत राम ायण घराघरात आहे तोपर्यंत आपली संस्कृती कोणीच संपवू शकणार नाही. आपल्या जीवनातील रोजची १५ मिनिटे रामायण ग्रंथ वाचण्यासाठी द्या. तुम्हाला तुमचे कर्म काय आहे ते समजून येईल.
साऱ्यांनी सोने लुटले – जैन मुनींच्या मार्गदर्शनानंतर ते पुढील कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले. त्यानंतर श्री राम मंदिराच्या प्रांगणात आपट्याची विधीवत पूजा करण्यात आली. खांद्यावर तलवारी घेऊन यजमान सोने लुटण्यासाठी गेले. त्या ठिकाणी पूजाअर्चा करून सोने लुटण्याचा कार्यक्रम संपन्न झाला… सोने लुटण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. त्यानंतर राजेशाही दसऱ्याची सांगता झाली.
मान्यवर भगिनी उपस्थित – हा ‘राजेशाही दसरा’ सोहळा यशस्वी करण्यासाठी श्रीराम मंदिर संस्था व मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या अनेक मंडळींनी फार मोठे परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला भूतपूर्व नगराध्यक्षा सौ. राजेश्वरी शेट्ये, सौ. उर्मिलाताई घोसाळकर, सौ. जया डावर, सौ. संजीवनी जामखेडकर, श्रीम. काकी नलावडे, सौ. अंजली इंदुलकर आदी मान्यवर भगिनी उपस्थित होत्या.
मान्यवरांची उपस्थिती – तसेच यावेळी ज्येष्ठ उद्योजक बाबासाहेब चौगुले, भूतपूर्व उपनगराध्यक्ष श्री. राजन शेट्ये, श्री. अरविंदशेठ जैन, श्री. केशवराव इंदुलकर, श्री. दिपक साळवी, श्री. सुधाकरराव सावंत, प्रा. प्रताप सावंत देसाई सर, श्री. विनायक हातखंबकर सर, श्री. रमाकांत पांचाळ सर, श्री. संतोष रेडीज, श्री. अनिल नागवेकर, श्री. राजू भाटलेकर, श्री. राकेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
अनेकांचे अथक परिश्रम – तसेच यावेळी श्री. राजेंद्र नेरकर, श्री. दिपक देसाई, श्री. संदीप डोंगरे, डॉ. दिलीप पाखरे, श्री. विनायक चव्हाण, श्री. विराज घोसाळकर, श्री. उपेंद्र सुर्वे, अॅड. विनय आंबुलकर, श्री. दिपक राऊत, श्री. सुनिल नलावडे, श्री. गिरीश जाधव, श्री. दत्ताराम, लिंगायत, श्री. प्रकाश शिंदे, श्री. अशोक आंबवकर, श्री. पी. डी. सावंत, भूतपूर्व नगरसेवक श्री. विकास पाटील, त्यांच्या सौभाग्यवती पाटील तसेच या सोहळ्याचे कमांडर इनचीफ श्री. नित्यानंद दळवी आदी अनेक मान्यवरांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
सोहळ्याचे मानकरी – या राजेशाही सोहळ्याचे सूत्रसंचालन प्राचार्य प्रताप सावंत देसाई सर व श्री. विनायक हातखंबकर सर यांनी अतिशय बहारदारपणे केले. या सोहळ्याला ७ ब्रह्मवृंद उपस्थित होते, श्री. सुयश तेरेदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सर्व धार्मिक विधी वेदोक्त पध्दतीने केले. देवस्थानचे श्री. विजय देसाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्यासाठी मोठे परिश्रम घेतले.