25.3 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriइन्फिगो आय केअर रत्नागिरीतर्फे मधुमेहींसाठी शिबीर

इन्फिगो आय केअर रत्नागिरीतर्फे मधुमेहींसाठी शिबीर

रत्नागिरी येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या वर्षपूर्ती निमित्ताने येत्या २६ ते २९ ऑगस्ट या कालावधीत डायबेटीस असणाऱ्या व्यक्तीच्या पडद्याच्या तपासणीसाठी महाशिबिराचे आयोजन केले आहे. इन्फिगोचा रेटिना विभाग अत्यंत अत्याधुनिक निदान यंत्रणांनी सुसज्ज असे रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,रायगड, जिल्ह्यांतील एकमेव सेंटर आहे. त्यामध्ये थ्री डायमेन्शन सिटीस्कॅन, ग्रीनलेझर, बी स्कॅन, फिल्ड एनालायजरसारखे अत्याधुनिक जर्मन आणि अमेरिकन तंत्रज्ञान उपलब्ध असून अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही केल्या जातात.

शिबिरामध्ये सुप्रसिद्ध रेटिना तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद कामत रुग्णांची तपासणी, उपचार आणि शस्त्रक्रिया करणार असून, यासाठी ९३७२७६६५०४ या क्रमांकावर पूर्वनोंदणी आवश्यक असून फोनद्वारे हि नोंदणी करून घेतली जाणार आहे  असे सांगण्यात आले आहे. मागील एक वर्षाच्या कालावधीमध्ये इन्फिगोच्या रेटिना सुपरस्पेशालिस्ट विभागाच्या माध्यमाने तीन हजारपेक्षा अधिक व्यक्तींवर डोळ्यांच्या पडद्याच्या आजारांवर उपचार करण्यात आले. या काळात डॉ. कामत यांनी दोनशेपेक्षा अधिक डोळ्यांच्या पडद्याच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या आणि कौशल्याने पार पाडल्या आहेत.

भारतामध्ये मधुमेहाची लागण असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. साधारण १५ टक्के व्यक्तींना मधुमेह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी निम्म्या लोकांना मधुमेहामुळे डोळ्यांच्या पडद्याचे गंभीर आजार होण्याचा आणि पुढे दृष्टी नष्ट होण्याचा तीव्र धोका संभवतो. यासाठी प्रत्येक मधुमेही व्यक्तीने आपल्या डोळ्यांची वर्षातून किमान दोनदा रेटिना स्पेशालिस्ट नेत्र तज्ज्ञांकडून तपासणी करणे आवश्यक असते.

इन्फिगोचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर श्रीधर ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्याची रेटिना तज्ज्ञ उपलब्ध नसल्याची समस्या लक्षात घेऊन इन्फिगोने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रत्येक मधुमेही व्यक्तींने या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा आणि कायम नेत्रसुखाचा आनंद घ्यावा.

RELATED ARTICLES

Most Popular