भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना गाबा मैदानावर खेळवला जात आहे. सध्या मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स भारताविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी करत असून गेल्या सामन्यात त्याने पाच विकेट्स घेतल्या होत्या. आता तिसऱ्या कसोटी सामन्यातही त्याने आतापर्यंत चार विकेट घेतल्या आहेत.
पॅट कमिन्सने चमत्कार – पॅट कमिन्स हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कर्णधार म्हणून सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्याने गॅरी सोबर्सचा विक्रम मोडला आहे. कमिन्सने कर्णधार म्हणून 119 कसोटी बळी घेतले आहेत. तर गॅरी सोबर्सने कर्णधार म्हणून 117 कसोटी बळी घेतले होते. आता कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी बळी घेण्याच्या बाबतीत कमिन्सपेक्षा फक्त दोनच खेळाडू पुढे आहेत. यामध्ये इम्रान खान (187 विकेट) आणि रिची बेनॉड (138 विकेट) यांचा समावेश आहे.
30 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले – पॅट कमिन्सने 30 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद भूषवले आहे, त्यापैकी 18 कसोटी सामन्यांमध्ये संघाने विजय मिळवला आहे आणि 7 सामन्यात पराभव पत्करला आहे. या काळात त्याने गोलंदाजी करताना 119 विकेट्स घेतल्या आहेत. ज्यामध्ये 8 पाच विकेट्सचा समावेश आहे. तिसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जे चुकीचे सिद्ध झाले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत एकूण 445 धावा केल्या. यानंतर भारतीय संघाने आतापर्यंत 9 गडी गमावून 225 धावा केल्या आहेत. भारताकडून केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी अर्धशतके झळकावली आहेत.