20.3 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeRatnagiriआम. राजन साळवी यांच्या प्रयत्नांना अखेर यश

आम. राजन साळवी यांच्या प्रयत्नांना अखेर यश

रत्नागिरी जिल्हयातील कोव्हीड-१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणेबाबत आवाहन केले आहे, त्या अनुषंगाने आम. डॉ. राजन साळवी प्रयत्नाने गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्याना काहीशा प्रमाणात दिलासा मिळाला आहे. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून मुंबईतून येणा-या चाकरमन्यांना आर.टी.पी.सी.आर. चाचणी करणे बंधनकारक केले असून ज्या प्रवाशांचे दोन डोस पूर्ण झाले असतील त्यांना चाचणीशिवाय जिल्हात प्रवेश दिला जाईल असे सूचित करण्यात आले आहे.

त्याअनुशंगाने आम. राजन साळवी यांनी रत्नागिरी जिल्हाधिकार्यांना प्रत्यक्ष भेटून, निवेदन देऊन आर.टी.पी.सी.आर. रिपोर्टचा अहवाल मिळण्यास दोन ते तीन दिवस कालावधी लागत असल्यामुळे जिल्हयात येणा-या नागरिकांची अन्टीजन चाचणी करुन प्रवेश देण्यात यावा असे निवेदन दिले आहे. कोव्हीशिल्ड या लसीचा पहिला डोस घेतल्या नंतर दुस-या डोससाठी नागरिकांना ८४ दिवस थांबावे लागत असल्याने सद्यास्थिती पाहता दूसरा डोस लगेच उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आल्याने कोव्हिशिल्ड पहिला डोस झालेल्या प्रवाशांची जिल्हा प्रवेशाच्या ठिकाणी  अन्टीजन चाचणी करुन प्रवेश देण्यात यावा असे निवेदन देऊन चर्चा केली.

जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार आम. राजन साळवी यांनी सूचित केल्याप्रमाणे जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्याची आर.टी.पी.सी.आर. चाचणी झाली असेल तर किंवा तसेच कोव्हीशिल्ड किवा कोवाक्सीनचा पहिला डोस झाला असेल तर त्या प्रवाशांची जिल्हयामध्ये प्रवेश करणाऱ्या ठिकाणी फक्त नोंद करणात येणार असून त्यांच्या गावाच्या ग्रामकृती दलाकडून आवश्यकतेनुसार तपासणी केली जाईल असे सांगितले. त्यामुळे गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे. आणि चाचणी करण्यासाठीचा वेळेची सुद्धा बचत होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular