26.1 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRajapurसोल्ये रेल्वेस्थानकावर गाड्यांना थांबे द्या, राजापूर तालुकावासीयांची मागणी

सोल्ये रेल्वेस्थानकावर गाड्यांना थांबे द्या, राजापूर तालुकावासीयांची मागणी

या स्थानकावर दिवा-सावंतवाडी ही एकमेव पॅसेंजर थांबते. 

कोकण रेल्वेमार्गावरील राजापूर तालुक्यातील सोल्ये येथील रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण झाले; मात्र, या ठिकाणी प्रवासीगाड्या थांबण्याचे प्रमाण कमी आहे. रेल्वेस्थानक चकाचक झाले. आता गाड्यांना थांबे मिळण्याची प्रतीक्षा कधी संपणार, असा प्रश्न प्रवासी करत आहेत. कोकण रेल्वेच्या माध्यमातून कोकण जगभरातील विविध भागांशी जोडला गेला असून, सर्वसामान्यांसाठी जग अधिक जवळ आले आहे. कोकण रेल्वेमार्गावरील तालुक्यातील सोल्ये येथील राजापूर स्थानकाचे सुमारे चार कोटी रुपये खर्च करून झालेल्या नूतनीकरणामुळे या स्टेशनचा चेहरामोहरा बदलला आहे; मात्र, कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या काही मोजक्या गाड्यांना या ठिकाणी थांबा मिळत असल्याने ज्या उद्देशाने या ठिकाणी रेल्वेस्टेशनची उभारणी करण्यात आली आहे तो उद्देश साध्य होत नाही. सोल्ये येथील राजापूर थांबा या नियमित स्थानकाव्यतिरिक्त सौंदळ येथे थांबा नाही. या स्थानकावर दिवा-सावंतवाडी ही एकमेव पॅसेंजर थांबते.

कोविडपूर्वी या ठिकाणी मडगाव-रत्नागिरी, दादर या सुरू असलेल्या पॅसेंजर गाड्या सौंदळ येथे थांबत होत्या; मात्र, कोविड काळामध्ये या ठिकाणी पॅसेंजर गाड्यांना असलेला थांबा बंद झाला तो आजतागायत पुन्हा सुरू झालेला नाही. सोल्ये येथील राजापूर थांबा या नियमित रेल्वेस्टेशनवरील गाड्यांचा थांब्याचा विचार करता या ठिकाणी मांडवी, कोकणकन्या आणि तुतारी या नियमित एक्स्प्रेससह उधना, नागपूर आणि अलीकडे सुरू झालेली थिविम, अहमदाबाद या गाड्यांसह दिवा- सावंतवाडी ही पॅसेंजर एक्स्प्रेसना थांबा मिळतो. राजापूर रोड रेल्वेस्थानकात जनशताब्दी एक्स्प्रेस, मत्स्यगंधा, वंदे भारत यांसह अन्य देशाचा महत्वपूर्ण भाग असलेल्या तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, गुजराथ, राजस्थान, मध्यप्रदेश, दिल्ली, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आदी राज्यांकडे जाणाऱ्या गाड्या या मार्गावरून धावतात. त्यांना या ठिकाणी थांबा मिळत नाही. गणेशोत्सव असो वा अन्य उत्सव वा हंगामामध्ये काही स्पेशल गाड्या या मार्गावरून धावतात. गेल्या कित्येक वर्षांपासून या ठिकाणी थांबा मिळावा, अशी राजापूरवासीयांची मागणी आहे. त्याकडे रेल्वेप्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.

गाड्याच नव्हे, तर स्टेशनबाबतही अन्याय – राजापूर विधानसभा मतदार संघामध्ये राजापूर आणि लांजा हे दोन तालुके येत असून, लांजा तालुक्याच्या तुलनेमध्ये राजापूर तालुका विस्ताराने मोठा आहे. मात्र, लांजा तालुक्यामध्ये विलवडे, आडवली या दोन परिपूर्ण स्थानकांसह वेरवली असे तिसरे स्थानक आहे; मात्र, राजापूर तालुक्यामध्ये सोल्ये येथील राजापूर थांबा या नियमित स्थानकासह केवळ सौंदळ येथे व्हॉल्टस्टेशन आहे.

राजापूर रोड रेल्वेस्थानकात थांबणाऱ्या गाड्या – कोकण कन्या एक्स्प्रेस (रोज), मांडवी एक्स्प्रेस (रोज), तुतारी एक्स्प्रेस (रोज), दिवा-सावंतवाडी पॅसेंजर एक्स्प्रेस (रोज), उधना एक्स्प्रेस, मडगाव-नागपूर, थिविम-अहमदाबाद

RELATED ARTICLES

Most Popular