टोकियो ऑलिम्पिकनंतर आता सर्वत्र चर्चा आहे ती, पॅरालीम्पिक २०२१ची. भारताच्या शिरपेचात सुवर्ण लक्ष्य साधून मानाचा तुरा रोवला आहे, १० मीटर एअर रायफलमध्ये पहिले सुवर्णपदक मिळवून देणारी पहिली भारतीय महिला खेळाडू अवनी लेखरा हिने. महिंद्र अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे कायमच सर्व खेळाडूंना अथवा कोणत्याही नवीन युक्तीला प्रोत्साहान देत असतात. भारतासाठी सुवर्णलक्ष्य भेदून पदकाची कमाई करणारी अवनी हिच्यासाठी एका खास एसयूव्हीची भेट दिली जाणार असल्याची घोषणा महिंद्रा यांनी सोशल मीडियावर केली आहे.
पुढे सांगताना आनंद महिंद्र म्हणतात कि, अवनीने टोकियो पॅरालीम्पिक मध्ये इतिहास रचला आहे. तिने १० मीटर एअर स्पर्धा एसएच १ मध्ये सुवर्ण पदक मिळविले असून, २४६.६ अंक मिळवून जागतिक रेकॉर्डची बरोबरी केली आहे. महिंद्रा ग्रुप अवनी आणि तिच्यासारख्याच विकलांग खेळाडू आणि सर्वसामान्य जनतेसाठी खास नवी कस्टमाईज एसयुव्ही डिझाईन बनवेल आणि अशी पहिली गाडी अवनीला समर्पित करून तिला गिफ्ट दिली जाईल.
आनंद महिंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार एक आठवड्यापूर्वी दीपा अॅथलेटने ती टोकियोमध्ये जश्या प्रकारची गाडी वापरते आहे, तशीच विकलांग खेळाडूंसाठी एक एसयूव्ही विकसित केरण्यात यावी असा सल्ला दिला होता. त्यानुसार आनंद महिंद्रा यांनी त्यांचे सहकारी व विकास प्रमुख वेलू यांना या आव्हानाची कल्पना दिली आणि ते स्वीकारून प्रत्यक्षात तसे मॉडेल तयार करण्यासाठी सुचविले आहे. या प्रकारे तयार झालेली पहिली कार अवनीला समर्पित आणि भेट देण्याची इच्छा आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केली आहे.
टोकियो ऑलिम्पिक मध्ये भालाफेकीत देशाला एकमेव सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या निरज चोप्रा याला महिन्द्रानी नवी एक्सयुव्ही ७०० भेट दिली गेली आहे. त्याचीही सर्व डिझाईन एक्सयुव्ही वेलू यांनीच विकसित केलेल्या आहेत.