25.3 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeDapoliदापोलीत मोबाईलवर गेम बघून ७ वीच्या विद्यार्थ्यांचे स्वतःच्या हातावर ब्लेडचे वार

दापोलीत मोबाईलवर गेम बघून ७ वीच्या विद्यार्थ्यांचे स्वतःच्या हातावर ब्लेडचे वार

१० ते १२ विद्यार्थ्यांनी मोबाईल मधील हाणामारीचा गेम पाहून स्वतः च्या हातावर ब्लेडने वार करून घेतले.

मोबाईल मधील व्हिडिओ गेम पाहून त्याचे अनुकरण करून स्वतः च्या हातावर ब्लेडने वार करण्याचा प्रकार दापोली तालुक्यातील एका शिक्षण संस्थेमध्ये घडला. यातील जखमी झालेल्या १० ते १२ मुलांना शाळेने समजावून सांगत पुन्हा असा प्रकार न करण्याचे हमीवर दोन तास अतिरिक्त अभ्यासाची शिक्षा देऊन सदर प्रकरण प्रकरणावर पडदा टाकल्याचे समजते. दापोली तालुक्यात एका सुप्रसिद्ध शिक्षण संस्थेत हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या शिक्षण संस्थेमध्ये सातवीच्या वर्गामध्ये शिक्षण घेणाऱ्या १० ते १२ विद्यार्थ्यांनी मोबाईल मधील हाणामारीचा गेम पाहून स्वतः च्या हातावर ब्लेडने वार करून घेतले. ही घटना शिक्षकांच्या लक्षात आल्यावर सर्वांना कार्यालयात नेण्यात आले. येथे पालकांना देखील बोलवण्यात आले. पालकांसमक्ष या विद्यार्थ्यांचे शाळेकडून समुपदेशन करण्यात आले. असे प्रकार पुन्हा होणार नाही याची हमी या विद्यार्थ्यांनी दिली.

काही पालकांनी तर विद्यार्थ्यांना शिक्षकांसमोरच चांगला चोप दिला. काही पालकांनी विद्यार्थ्यांचा दाखला काढून द्या, असे शाळेला सांगितले. मात्र शाळेने मुले लहान असल्यामुळे व हा प्रकार अजाणतेपणात घडला असल्यामुळे याबाबत सामंजस्याची भूमिका घेतली. या प्रकाराबाबत विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणून विद्यार्थ्यांनी घरी दोन तास अधिकचा अभ्यास करायचा. तो पालकांना दाखवायचा व नंतर तो शाळेत देखील दाखवायचा अशी शिक्षा सर्व विद्यार्थ्यांना दिली. अजाणत्या वयामध्ये मोबाईल गेममुळे झालेल्या या प्रकाराने प्रकाराची दापोली तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular