26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriरत्नागिरीत ठाकरे गटाला विडार आज शिवसैनिकांचा शिवसेनेत प्रवेश

रत्नागिरीत ठाकरे गटाला विडार आज शिवसैनिकांचा शिवसेनेत प्रवेश

५०० शिवसैनिक ठाकरे गटाला रामराम ठोकून शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला मोठे ोठे खिंडार पडले असून शुक्रवारी (२४ जानेवारी) पदाधिकारी, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख शाखाप्रमुख, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य असे जवळपास ४५० ते ५०० शिवसैनिक ठाकरे गटाला राम राम ठोकत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. रत्नागिरीतील हॉटेल विवेकच्या मराठा मैदानावर दुपारी १२ वाजता हा भव्यदिव्य असा पक्षप्रवेश सोहळा होणार असून पालकमंत्री ना. उदय सामंत हे या सर्वांचे पक्षात स्वागत करणार आहेत. आजवरचा हा सर्वांत मोठा पक्षप्रवेश सोहळा ठरेल असा विश्वास शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या पक्षप्रवेश सोहळ्याची जंगी तयारी करण्यात आली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर शिवसेना ठाकरे गटात निराशा पसल्याचे चित्र दिसू लागले होते. यामुळे काही पदाधिकाऱ्यांनी याआधीच शिवसेना ठाकरे गटाला राम राम ठोकत शिंदे गटात किंवा भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

मात्र शुक्रवारी होणारा पक्षप्रवेश सोहळा हा खूप मोठा असून प्रत्येक जिल्हा परिषद गटातील उबाठाचे बहुसंख्य पदाधिकारी सरपंच, उपसरपंच, शाखाप्रमुख, विभागप्रमुख, शिवसैनिक यावेळी शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करतील. उद्या अर्ध्याहून अधिक उबाठा सेना खाली होईल असे शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख विपीन बंदरकर यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.

शहरातील पदाधिकारी – ग्रामीण भागातील प्रत्येक जि. प. गटातील प्रमुख पदाधिकारी आणि शाखाप्रमुख, सरपंच, उपसरपंच यांच्याबरोबरच रत्नागिरी शहरातील शिवसैनिकदेखील धनुष्यबाण हाती घेणार आहेत.

प्रत्येक जि. प. गटातील पदाधिकारी – शुक्रवारी होत असलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात नाचणे, करबुडे, गोळप, हरचेरी, पावस, मिरजोळे या जि. प. गटातील शेकडो पदाधिकारी ठाकरे गटाला रामराम ठोकंणार आहेत. हरचेरी जि. प. गटातील जवळपास १५० ते २०० शिवसैनिक शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामध्ये ५ सरपंच आणि अनेक पदाधिक्रारी असल्याचे महेंद्र झापडेकर यांनी सांगितले.

बालेकिल्ल्याला सुरूंग ? – नाचणे जि. प. गट हा. उबाठाचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यालादेखील खिंडार पडले असून शाखाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, ग्रा. प. तील लोकप्रतिनीधी शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करतील असे जि. प. चे माजी अध्यक्ष जयसिंग घोसाळे यांनी सांगितले.

गोळपमध्येही खिंडार – गोळप तसेच करबुडे- जि. प. गटातदेखील ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडले असून अनेक शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, शिवसेना पदाधिकारी प्रवेश करणार आहेत. त्यामध्ये काही सरपंचांचादेखील समावेश आहे. करबुडे जि. प. गटातील अनेकजण प्रवेश करणार आहेत. मिरजोळे जि. – प. गटातही ठाकरेसेनेला खिंडार पडले आहे, असे सांगण्यात आले..

बंड्याशेठ साळवींचाही प्रवेश – मालगुंड जि. प. गटातही उबाठाला धक्का बसला असून रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष आणि उबाठा गटाचे माजी तालुकाप्रमुख प्रदीप तथा बंड्याशेठ साळवी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिक शुक्रवारी शिंदे गटात प्रवेश करतील. बंड्याशेठ साळवी यांनी २ दिवसांपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे..

५०० जणांचा प्रवेश – शुक्रवारी प्रवेश करणाऱ्यांची यादी पाहता जवळपास ५०० शिवसैनिक ठाकरे गटाला रामराम ठोकून शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत हे या सर्वांचे पक्षामध्ये स्वागत करणार आहेत. शुक्रवारी दुपारी १२ वाजता मराठा मैदानावर हा भव्यदिव्य प्रवेश सोहळा पार पडणार आहे. त्याची जंगी तयारी करण्यात आली आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे आता रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर ना. उदय सामंत यांचे एकहाती वर्चस्व पहायल मिळणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular