28.6 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriशिवशाहीमुळे एसटी महामंडळाला सोसावा लागलाय तोटा

शिवशाहीमुळे एसटी महामंडळाला सोसावा लागलाय तोटा

३४ गाड्यांचा महिन्याचा तोटा काढला तर १ कोटी १२ लाखावर जातो.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटीकडे अधिक प्रवासी आकर्षित करण्यासाठी एसटीच्या ताफ्यात ५ वर्षांपूर्वी अलिशान शिवशाही गाड्या आल्या. रत्नागिरी विभागाला त्यातील ३४ गाड्या मिळाल्या. वातानुकुलीत, आरामदायी गाड्यांना चांगला प्रतिसात मिळेल अशी महामंडळाची धारणा होती. परंतु शिवशाही बस म्हणजे एसटी महामंडळाला पांढरा हत्ती पोसल्यासारखा आहे. शिवशाहीला प्रत्येक किमीला ५० रुपये उत्पन्न आहे. तर ७२ रुपये खर्च आहे. प्रत्येक किमीला २२ रुपयाचा तोटा या गाडीमुळे एसटी महामंडळाला सहन करावा लागत आहे. दिवसाला शिवशाही ५०० किमी फरते. ३४ गाड्यांचा महिन्याचा तोटा काढला तर १ कोटी १२ लाखावर जातो. त्यामुळे शिवशाही बस महांडळाला सावरणारी नाही, तर आर्थिक खड्ड्यात घालणारी ठरत आहे.

एसटी महामंडळाची परिस्थितीः काही वेगळी सागण्याची गरज नाही. आधिच तोट्यात असलेले एसटी महामंडळ कोरोना महामारी आणि कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुन्हा आर्थिक खाईत लोटले गेले. काळानुरूप एसटी महामंडळाने कात टाकण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांच्या मुलभूत गरजांचा विचार करून एसटीने खाससी आराम दायी गाड्यांशी स्पर्धा सुरू केली. लाल डब्याने कात टाकत सुरवातीला निमऔराम गाड्या काढल्या. त्यानंतर टु बाय टु आसनाच्या गाड्या आल्या. विठाई, हिरकणी, मिडीबस, परिवर्तन बसेस आदी गाड्या एसटीच्या ताफ्यात आल्या. परंतु खासगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करण्यासाठी त्या तोडीची बस ताफ्यात उतरविण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. आणि २०१९-२० च्या दरम्यान महामंडलामध्ये अलिशान शिवशाही गाडी आली.

रत्नागिरी विभागाच्या वाट्याला यातील ३४ शिवशाही आल्या. पाच वर्षे झाली या गाड्या अजूनही सुस्थिती आहे. परंतु साध्या गाड्या आणि शिवशाही गाड्यांमध्ये मोठा फरक आहे. या गाड्या सेन्सरवर चालतात, सेंसर खराव झाला तर गाडी बंद पडले. वातानुकुलीत यंत्रणेचे स्वतंत्र काम करून घ्यावे लागते. उर्वरित काम करताना साध्या गाड्यांच्या तुलनेत या गाड्यांचे सुट्टे भाग (स्पेअरपार्ट) महागडे आहेत. प्रत्येक किमीला या गाडीचे उत्पन्न ५० रुपये आहे. परंतु खर्च ७२ रुपये आहे. शिवशाहीच्या प्रत्येक किमीला एसटीला २२ रुपये तोटा सहन करावा लागत आहे. वर्षाला सुमारे १ कोटी १२ लाख म्हणजे गेल्या ५ वर्षांमध्ये साडे पाच कोटीच्या तोटा शिवशाहीम ळे महामंडळाला सहन करावा लागला आहे. रत्नागिरी एसटी विभागाला शिवशाही बस म्हणजे पांढरा हत्ती पोसल्या सारखंच आहे.

RELATED ARTICLES

Most Popular